Shraddha Kapoor Stree 2 Trailer Released : श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री’ चित्रपट २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशानंतर सर्वत्र ‘स्त्री २’बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गेल्या महिन्यात पोस्ट शेअर करत अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘स्त्री २’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘स्त्री २’ चित्रपटाची कथा ही चंदेरी गावाभोवती फिरते. या चित्रपटाच्या पहिला भागात गावकरी ‘स्त्री’च्या दहशतीमुळे त्रस्त झाले होते. परंतु, आता या चंदेरी गावात सरकटे भूत दाखल झालं आहे. हे भूत गावकऱ्यांसाठी ‘स्त्री’पेक्षाही धोकादायक ठरत आहे. यंदा या कथेत आणखी एक ट्विस्ट आहे तो म्हणजे ‘स्त्री २’मध्ये श्रद्धा कपूर गावकऱ्यांचं रक्षण करताना दिसणार आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”
जान्हवीने तत्त्व इंडियाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर टिप्पणी करीत ‘पुष्पा २’चे समर्थन केले आणि भारतीय सिनेमाला कमी लेखण्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. (Photo Credit - thetatvaindia Instagram)
Pushpa 2 Vs Interstellar वादात जान्हवी कपूरने घेतली उडी; कमेंट करत म्हणाली, “तुम्ही पाश्चिमात्य…”

हेही वाचा : “…त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो”, निक जोनासने पत्नी प्रियांका चोप्राला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

चित्रपटाच्या ट्रेलरमधील अनेक दृश्य, VFX लक्षवेधी ठरतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘स्त्री २’मध्ये कॅमिओ करणार आहे. चित्रपटात तिचा एक स्पेशल डान्स नंबर असेल असं ट्रेलर पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. ‘स्त्री २’ मध्ये प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने भरजरी लेहेंग्याऐवजी लग्नात साडी का नेसली? घरीच का बांधली लग्नगाठ? म्हणाली, “झहीर आणि मला…”

पाहा ‘स्त्री २’ चित्रपटाचा ट्रेलर ( Stree 2 Trailer )

stree 2 trailer
श्रद्धा कपूर Stree 2 चित्रपट

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

दरम्यान, श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांनी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची दमदार स्टारकास्ट, कलाकारांचं अचूक कॉमिक टायमिंग आणि उत्तम अभिनय यामुळे ‘स्त्री २’ चा ट्रेलर आणखी मजेशीर व उत्कंठावर्धक झाला आहे. ‘स्त्री 2’ चं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना आता दुसऱ्या (Stree 2) भागाकडून प्रचंड अपेक्षा आहेत.

Story img Loader