Stree 2 Box Office Collection Day 8 : सध्या बॉक्स ऑफिसवर होतेय ती ‘स्त्री-२’ ची सर्वात जास्त चर्चा. बॉलीवूडमध्ये सध्या या चित्रपटाचा जलवा पाहायला मिळत आहे. सलग आठव्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणारा ‘स्त्री-२’ या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्डने मोडून काढले. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ७० कोटींची कमाई केली होती. फक्त भारतातच नाही, तर वर्ल्ड वाईबवरदेखील ‘स्त्री-२’चा जलवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने (stree2) दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री घेतली असून, आठव्या दिवशीदेखील विक्रमी कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलग आठव्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘स्त्री-२’ला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. या सिनेमाने आठव्या दिवशी तब्बल ३०० कोटींचा आकडा पार करत नवा विक्रम रचला आहे. बऱ्याचदा असं होतं की, चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षक जेवढी पसंती देतात, तेवढी पसंती दुसऱ्या भागाला मिळत नाही. मात्र, या विधानाला हा ( Stree2 ) चित्रपट अपवाद ठरला आहे.

हेही वाचा – बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या Stree 2 साठी श्रद्धा कपूर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याने घेतलं सर्वाधिक मानधन

Stree 2

‘स्त्री’चा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२९ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला ( Stree2 ) प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘स्त्री-२’ने आठव्या दिवशी ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री२’ला मिळणाऱ्या पसंतीमुळे अक्षय कुमारचा ‘खेल खेल’, जॉन अब्राहमचा ‘वेदा’ या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. अक्षयच्या ‘खेल खेल’ने १९.५ कोटी, तर जॉनच्या ‘वेदा’ने १७ कोटींची कमाई केली आहे.

‘कल्की’, ‘डंकी’, ‘पठाण’, ‘जवान’ आणि’ गदर २’ या चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं होतं. मात्र, ‘स्त्री-२’मधील हॉरर कॉमेडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘स्त्री-२’ने ( Stree2 ) ‘गदर २’चादेखील रेकॉर्ड मोडून काढला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८४ कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा – ‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरची ‘क्रिश ४’मध्ये वर्णी? महत्त्वाची माहिती आली समोर

‘स्त्री-२’ने ( Stree2 ) मिळवलेल्या या यशाबद्दल ‘गदर २’मधील अभिनेता सनी देओलने ‘स्त्री-२’च्या संपूर्ण टीमचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या केमिस्ट्रीला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे श्रद्धा आणि राजकुमार यांच्यावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stree two box office collection in seconad week 8 th day was 300 crore in india tsg99