Stree 2 Box Office Collection Day 10th : ‘स्त्री’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला मिळणारा प्रतिसाद पाहता, या चित्रपटाचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. बॉक्स ऑफिसवर एखादा चित्रपट येतो, तो पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो; मात्र दुसऱ्या आठवड्यात नवे चित्रपट प्रदर्शित झाले की, प्रेक्षकांचं लक्ष दुसऱ्या चित्रपटांकडे जातं. परंतु, ‘स्त्री २’ याला अपवाद ठरला आहे. या चित्रपटानं सलग १० व्या दिवशीदेखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून, सध्या बॉलीवूडमध्ये ‘स्त्री २’ची चर्चा आहे.

सलग १० व्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

‘स्त्री २’चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटानं २०२४ मधील आतापर्यंतच्या चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. या संदर्भात ‘स्त्री २’चे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या इन्स्टाग्राम पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.’स्त्री २’नं दुसऱ्या आठवड्यातदेखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटानं सलग १० व्या दिवशी एकूण ४२६ कोटींची कमाई केली असून, वर्ल्ड वाइबवर ५०५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी तब्बल ३३ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे दुसऱ्या आठवड्यातही ‘स्त्री २’ हा ‘ब्लॉकबस्टर सिनेमा’ ठरला आहे.

Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
when shakti kapoor offered help to archana puran singh buy flat
शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”
allu arjun pushpa 2 collection box office day 31 and varun Dhawan baby john struggles to mint even 1 crore
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ने शनिवारी केली ‘इतकी’ कमाई
most google searched indian movies on ott
वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध
maddcok universe new release date stree 3 munjya 2
ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…


हेही वाचा – बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या Stree 2 साठी श्रद्धा कपूर नव्हे, तर ‘या’ अभिनेत्याने घेतलं सर्वाधिक मानधन

भारतात ‘या’ ठिकाणी ‘स्त्री २’चे सर्वाधिक शो


देशभरात आणि वर्ल्ड वाइबवरदेखील ‘स्त्री २’ची चर्चा आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत (stree2) चे दिल्लीतील चित्रपटगृहांत एकूण ११९५ सर्वाधिक शो झाले आहेत; तर बंगळुरूमध्ये ३७३ शो दाखविण्यात आले आहेत. मुंबईतदेखील ‘स्त्री २’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत या चित्रपटाचे ११३६ शो झाले असून, पुण्यात ४२४ शो झाले आहेत.

हेही वाचा – ‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरची ‘क्रिश ४’मध्ये वर्णी? महत्त्वाची माहिती आली समोर

चित्रपटाच्या यशाबद्दल काय म्हणाला राजकुमार राव ?


याचपार्शभूमीवर चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल राजकुमार रावने माध्यमांना मुलाखत दिली. त्याने सांगितलं की, ‘स्त्री’चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी भरभरुन पसंंती दिली होती. तेव्हापासून या चित्रपटाचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल करायचं ठरवलं तेव्हा एक अभिनेता म्हणून मला हे माहित होत की, प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील चांगला प्रतिसाद देतील. मात्र सध्या ‘स्त्री २’ प्रकारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करतोय ते आमच्या अपेक्षेपेक्षा ही जास्त आहे. त्यामुळे चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून आनंद वाटतोय, असं राजकुमार राव याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Story img Loader