Arshad Warsi Birthday : आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा हरहुन्नरी अभिनेता अर्शद वारसीचा आज ५५ वा वाढदिवस. चित्रपटसृष्टीत अर्शदला ओळख आणि लोकप्रियता तशी उशिराच मिळाली, पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याच्या या जिद्दीमुळेच आज भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. अर्शदने तसं बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे, पण त्याला खरी ओळख ही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या सर्किट या पात्रामुळे मिळाली अन् त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

आज आपण अर्शदच्या आयुष्याबद्दल काही वेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अर्शदचा जन्म मुंबईच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्याचे वडील अहमद अली खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत म्युझिशियन म्हणून काम केलं होतं. नंतर त्यांनी सूफी संत वारिस अली शाह यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यानंतरच त्यांनी वारसी हे आडनाव आपल्या नावाबरोबर जोडलं. अर्शदच्या वडिलांनी प्रथम अभिनेत्री रंजना सचदेवशी लग्न केलं होतं, त्यांना दोन मुलंही झाली.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Burglary at Mayur Colony in Kothrud property worth Rs 4.5 lakh stolen
कोथरुडमधील मयूर कॉलनीत घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज चोरीला
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यात असे काही पुरुष आहेत जे…” प्रियांका चोप्राचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

वयाच्या १४ व्या वर्षी अर्शदच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आणि तो अनाथ झाला. नंतर मुंबईत आयुष्य घालवण्यासाठी त्याने बरेच कष्ट सोसले. दैनंदिन जीवनातील संघर्ष इतका वाढला की अर्शदला १० वी नंतर शिक्षणही सोडावं लागलं. आर्थिक समस्येतून मार्ग काढण्यासाठी लहान वयातच अर्शदला घरोघरी जाऊन वेगवेगळ्या वस्तू विकाव्या लागल्या. यानंतर त्याने एका फोटो लॅबमध्ये काम सुरू केलं आणि यादरम्यानच त्याला नृत्यामध्ये रुची निर्माण झाली अन् त्याला अकबर सामी यांच्या डान्स ग्रुपमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवीसाठी कोरिओग्राफीदेखील अर्शदनेच केली आहे.

अर्शदला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच नव्हती, ही गोष्ट फार अचानक आणि नशिबाने घडल्याचं अर्शदने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांची निर्मिती संस्था ABCL च्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अर्शद वारसीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. यामध्ये अर्शदसह चंद्रचूड सिंग, प्रिया गिल हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. याबरोबरच अर्शदने ‘हासिल’, ‘गोलमाल सीरिज’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जॉली एलएलबी’अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. अर्शद लवकरच संजय दत्तसह एका नव्या चित्रपटात झळकणार आहे, शिवाय त्याच्या ‘असुर’ या वेबसीरिजच्या पुढच्या सीझनचीही चाहते आतुरतेने वाट बघत आहे.

Story img Loader