एका ४८ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने व्हॅलेंटाईन डेला दुसरं लग्न केलं आहे. त्याने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून याबद्दल माहिती दिली. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर हा अभिनेता व त्याच्या पत्नीच्या वयातील अंतराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, कारण त्याची पत्नी ही त्याच्यापेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टाईल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ फेम अभिनेता साहिल खानने त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असलेली त्याची गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्राशी दुसरं लग्न केलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दुबईतील बुर्ज खलिफा येथे या दोघांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. आता या रिसेप्शनमधील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साहिल खान आणि मिलेना लग्नाच्या रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अभिनेत्याने क्लासिक काळ्या रंगाचा सूट घातला होता. तर त्यांच्या पत्नीने पांढरा गाऊन या खास दिवसासाठी निवडला होता. या दोघांनी रिसेप्शनमध्ये 6 टियर केक कापला. केक कापतानाचा व्हिडीओ साहिलने पोस्ट केला आहे.

साहिलने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व त्याची बायको केकबरोबर पोज देत आहे. “अखेर लग्न झालं. अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. सर्वांना जीवनात प्रेम, आनंद आणि यश मिळो,” असं साहिलने लिहिलं.

साहिल खानची दुसरी पत्नी कोण आहे?

साहिल खान ४८ वर्षांचा आहे. तर मिलेना २२ वर्षांची आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना साहिलने त्याच्या व मिलेनाच्या वयाच्या अंतरावर भाष्य केलं होतं. “मिलेना खूप हुशार आहे. तसेच ती खूप संवेदनशील आहे, कारण ती लहान आहे. आमच्या वयात खूप अंतर आहे. पण ती इतर तिच्या वयाच्या मुलींसारखी नाही. ती खूप मॅच्युअर व स्वभावाने शांत आहे,” असं साहिलं मिलेनाबद्दल म्हणाला होता.

साहिलने सांगितलं होतं की मिलेना युरोपमधील बेलारूसची आहे. तिचं शिक्षणही पूर्ण झालं आहे. या दोघांनी रशियात साखरपुडा केला होता. साहिलच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अभिनेत्री नेगर खानशी लग्न केलं होतं. पण २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर २० वर्षांनी साहिलने मिलेनाशी दुसरं लग्न केलं आहे.