प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वाढदिवसाचं एक दिवस आधीच जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या बर्थडे पार्टीला बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. यात सलमान खानपासून ते ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा समावेश होता. या बर्थ डे पार्टीचे वेगवेगळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक सलमान खानचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्याची बरीच चर्चाही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘परदेस’, ‘ऐतराज’, ‘खलनायक’, ‘राम लखन’ यांसारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई आज जानेवारीला ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल सोमवारी रात्री प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खरं तर केक कटिंगच्या या व्हिडीओमध्ये सलमान खानची बरीच चर्चा होत आहे. सुभाष घई यांनी सलमान खानसोबत वाढदिवसाचा केक कापला आणि सलमान खाऊ घातला. आधी सलमानने खाण्याचे नाटक केले आणि नंतर त्यांच्या हातातील केकचा तुकडा खाल्ला. आता युजर्स सलमान आणि सुभाष घईंच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

आणखी वाचा-गुजरातमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ला विरोध नाही; बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय

एका युजरने लिहिलं, “इतके मोठे सेलिब्रिटी आले पण केक फक्त सलमानबरोबरच कापला जात आहे, तो सगळ्यांचाच लाडका आहे.” सलमानच्या बॉडीगार्डला पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं, “शेरा नेहमीच वेगळ्या अंदाजात दिसतो.” तर आणखी एकाने लिहिलं, “सलमान खानने टेबल क्लॉथला हात पुसले.” सलमान खानने केक भरवल्यानंतर टेबलक्लॉथला हात पुसल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे आणि यावरच अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- “त्यांनी माझे फोटो बघून सांगितले की…” श्रेयस तळपदेने सांगितला सुभाष घईंबद्दलचा ‘तो’ किस्सा

दरम्यान सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोमवारी सलमानने त्याच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि सांगितले की चित्रपटाचा टीझर २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार्‍या सलमानच्या या चित्रपटाचा टीझर ‘पठाण’च्या स्क्रिनिंगच्यावेळी दाखवला जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash ghai birthday salman khan clean his hand using table cloth video viral mrj