मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ‘परदेस’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘ताल, यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘परदेस’ हा त्यांचा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित काम करण्यासाठी उत्सुक होती. परंतु सुभाष घई यांनी तिची निवड न करता महिमा चौधरी हिला प्रमुख भूमिकेसाठी निवडले. याचं कारण त्यांनी एका मुलाखतीत उघड केलं होतं.

हा चित्रपट म्हणजे एक लव्हस्टोरी आहे. यात महिमा चौधरीने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, चित्रपटातली गाणी हे सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. गेल्याच वर्षी या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली. यावेळी त्यांनी या चित्रपटाबद्दलचे अनेक किस्से शेअर केले होते. याच दरम्यान त्यांनी माधुरी दीक्षितला या चित्रपटात का निवडलं नाही तेही सांगितलं होतं.

आणखी वाचा : “चांगली संधी वाया घालवली…” ‘ए वतन मेरे वतन’च्या टीझरमुळे सारा अली खान ट्रोल

हेही वाचा : सुभाष घईंच्या वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात कैद झाली सलमानची ‘ती’ कृती

‘परदेस’ या चित्रपटात काम करण्यासाठी सलमान खान आणि माधुरी दीक्षित हे दोघेही उत्सुक होते. या चित्रपटात अपूर्व अग्निहोत्रीने जी भूमिका साकारली होती ती सलमान खान साकारण्यास इच्छुक होता. तर महिमा चौधरीने जी भूमिका साकारली ती माधुरी दीक्षितला साकारायची होती. परंतु सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांना डावलून सुभाष घई यांनी महिमा आणि अपूर्व यांची निवड केली. या चित्रपटातील ‘कुसूम’ या व्यक्तिरेखेसाठी सुरुवातीला माधुरी दीक्षितची निवड करण्यात आली होती. माधुरीला या चित्रपटाची कथाही आवडली होती. ही भूमिका माधुरी दीक्षितला मिळावी अशी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची इच्छा होती. मात्र सुभाष घई यांनी महिमा चौधरीची निवड केली.

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

यामागचं कारण सांगताना ते म्हणाले होते, “लेखक आणि दिग्दर्शक म्हणून माझा पहिला फोकस हा त्या व्यक्तिरेखेवर असतो. मी कधीही कलाकाराला नजरेसमोर ठेवून कोणतीही भूमिका लिहीत नाही. आधी व्यक्तिरेखा आणि कथा लिहिली पाहिजे आणि मग त्यासाठी कलाकाराची निवड केली पाहिजे. त्यामुळे मी कधीही कलाकाराला डोळ्यासमोर ठेवून कोणतेही व्यक्तीरेखा लिहीत नाही.”

१९९७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अपूर्व अग्निहोत्री, महिमा चौधरी यांबरोबरच शाहरुख खान, अमरीश पुरी, आलोक नाथ, हिमानी शिवपुरी त्यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Story img Loader