Subhash Ghai Comment on Bollywood Actors: सुभाष घई हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. सुभाष घई हे बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्यांबद्दल त्यांचं मत ठामपणे मांडतात. आता त्यांनी एका मुलाखतीत काही स्टार्सबद्दल केलेली विधानं चर्चेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज खानचा चॅट शो ‘द इनव्हिन्सिबल्स सीरीज’च्या सीझन २ मध्ये सुभाष घई सिनेसृष्टीबद्दल गप्पा मारताना दिसतील. या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे, यामध्ये सुभाष घई जॅकी श्रॉफ यांना सर्वात वाईट अभिनेता म्हणतात. यावेळी ते शत्रुघ्न सिन्हासह इतर काही जणांबद्दल मत मांडतात.

श्वेता बच्चनला खूप आवडायचा वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड; त्याची ‘ही’ वस्तू जवळ घेऊन झोपायची, स्वतःच केलेला खुलासा

सुभाष घई म्हणाले, “अभिनेत्यांचे पाच प्रकार असतात. एक नॉन अॅक्टर असतो. दुसरा म्हणजे वाईट अभिनेता. वाईट अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) होता. अनिल कपूर चांगला अभिनेता आहे. अतीआत्मविश्वासू शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) होते, त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती की ते कधीच वेळेवर यायचे नाहीत.”

सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ व अनिल कपूर यांच्याबरोबर १९८९ मध्ये आलेल्या ‘राम लखन’ या चित्रपटात काम केले होते. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर ‘कालीचरण’ (१९७६) आणि ‘विश्वनाथ’ (१९७८) या चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते.

१९ वर्षांचा संसार, बॉलीवूड अभिनेत्रीने पतीचं आडनाव हटवलं अन् चित्रपट झाला सुपरहिट; म्हणाली…

शाहरुख खानबरोबर मतभेद

सुभाष घई यांनी १९९७ मध्ये आलेल्या ‘परदेस’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. त्याबद्दल म्हणाले, “मी शाहरुख खानबरोबर परदेसमध्ये काम केलं होतं, पण आम्हा दोघांमध्ये त्यावेळी खूप मतभेद होते. आमचे एकमेकांशी वाद होत असायचे.” एकवेळ अशी आली होती की सुभाष घई यांनी स्टार्सबरोबर काम न करायचं ठरवलं होतं. “कर्ज (१९८०) या चित्रपटानंतर मी ठरवलं की जर मला चांगले चित्रपट तयार करायचे असतील तर मी आताच्या कोणत्याच स्टारबरोबर काम करणार नाही,” असं ते म्हणाले.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

सुभाष घई भारतीय सिनेसृष्टीचे ‘शोमन’ म्हणून ओळखले जातात. कालीचरण (१९७६), विश्वनाथ (१९७८), कर्ज (१९८०), हीरो (१९८३), विधाता (१९८२), मेरी जंग (१९८५), कर्मा (१९८६), राम लखन (१९८९), सौदागर (१९९१), खलनायक (१९९३), परदेस (१९९७) आणि ताल (१९९९) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash ghai says jackie shroff bad actor shatrughan sinha was overconfident hrc