९० च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने (Suchitra Krishnamoorthi) आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘कभी हां कभी ना’मध्ये तिने केलेली भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटामुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. आता पडद्यावर दिसत नसली तरी सुचित्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने नुकतीच एक पोस्ट करून बर्लिनमधील नेकेड पार्टीत सहभागी झाल्याचा खुलासा केला आहे. काहीतरी चांगला अनुभव मिळेल या विचाराने ती इथे गेली होती. पुढे काय घडलं ते तिनेच सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुचित्राने नुकतीच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. “मी बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्हिटी/नेकेड पार्टीमध्ये सहभागी झाले. पण तिथे मला ‘इतके मोकळ्या विचारांचे होऊ नका की तुमचं डोकं खराब होईल’ ही म्हण आठवली. मी नेहमीच एस देसी मुलगी राहीन. आता आंघोळ करून गायत्री मंत्राचा जप करावा असं वाटतंय. बाप रे,” असं सुचित्राने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सुचित्रा कृष्णमूर्तीने केलेली एक्स पोस्ट

या न्यूड पार्टीत जाण्याचा अनुभव तिने ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना सांगितला. एका मित्राच्या माध्यमातून ती या पार्टीत पोहोचली होती, या पार्टीचा उद्देश शरीराबद्दल सकारात्मकता वाढवणे आणि शरीराबद्दलचे न्यूनगंड दूर करणे हा होता. या पार्टीत अनुभव घेण्यासाठी आनंदाने सुचित्रा तिथे गेली, पण तिथले दृश्य ती पाहू शकली नाही.

Video: ऐश्वर्या राय-आराध्या बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बिग बींच्या नातीने वळून पाहिलं अन् पापाराझींना म्हणाली…

पार्टीतील दृश्य पाहून बसला धक्का – सुचित्रा

सुचित्रा म्हणाली, “या गोष्टी इथे खूप सामान्य आहेत. एका बारमध्ये पार्टी सुरू होती. हा पब माझ्या मित्राच्या मित्राचा होता. या पबमधील पाहुण्यांच्या यादीत माझंही नाव होतं. मी तिथे गेले पण आतमध्ये पोहोचताच तिथले दृश्य पाहून मला धक्का बसला आणि लगेच तिथून पळ काढला. कारण मी एक साधी देसी मुलगी आहे आणि मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट बघायचे नव्हते.”

‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…

पार्टीचा उद्देश चांगला, पण…

सुचित्रा पुढे म्हणाली, “पण ही पार्टी चांगल्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. ही मजेदार आणि सकारात्मक गोष्ट आहे. तिथे अजिबात अश्लीलता नव्हती. पण भारतीय म्हणून आपण आपल्या शरीराविषयी जागरूक राहण्यास शिकवलं जातं.” सुचित्रा या पार्टीमध्ये २० मिनिटं थांबली आणि मग निघून आली. ती पार्टी रात्रभर सुरू होती, असं तिने नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suchitra krishnamoorthi attended naked party in berlin hrc