चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची पूर्वाश्रमीची पत्नी व अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना प्रपोज केलं होतं. तिने स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. तिने लग्नाची मागणी घातल्यावर वर्मांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही तिने सांगितलं होतं. तिने लग्नाची मागणी घातल्यावर राम गोपाल वर्मा घाबरले होते. संपूर्ण किस्सा नेमका काय आहे, ते जाणून घेऊयात.
सुचित्राने तिच्या आत्मचरित्रात राम गोपाल वर्मांना मेसेज पाठवल्याचा उल्लेख केला आहे. “तू माझ्याशी लग्न करशील का?” असा मेसेज सुचित्राने वर्मांना पाठवला होता. या दोघांनी ‘माय वाईफ्स मर्डर’ आणि ‘रण’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र राम गोपाल वर्मांनी सुचित्राशी लग्न करायला नकार दिला होता.
“अर्जुन कपूरचं करिअर संपलंय,” बॉलीवूड अभिनेत्याची टीका; म्हणाला, “तो घरात बसून मलायकाची…”
सुचित्राच्या मेसेजला रिप्लाय देताना राम गोपाल वर्मांनी म्हटलं होतं, “सुचित्रा मला वाटतं की तुला माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. आपल्यात काहीच साम्य नाही. माझा विवाह संस्थेवर विश्वास नाही. मी स्त्रियांचा फक्त सेक्ससाठी वापर करतो, मला स्त्रियांचे शरीर आवडते पण त्यांचा मेंदू नाही. माझ्या मते, स्त्रियांना फक्त पाहायला हवं, त्यांना ऐकू नये. त्यामुळे तू शक्य तितकं माझ्यापासून दूर राहा.”
“…म्हणून आम्ही मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” ‘बाईपण भारी देवा’मधील मराठमोळ्या सुकन्या मोनेंचा खुलासा
दरम्यान, ‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने लग्नाची मागणी घालणं मस्करी होती, असं म्हटलं होतं. सुचित्रा म्हणाली, “ही फक्त मी केलेली मस्करी होती. राम गोपाल वर्मा यांच्याशी लग्न करण्याचा विचार कोणी कसा करू शकतं? ते खूप चांगले आहेत, पण ते माझ्या मेसेजला घाबरले होते. त्यांनी माझा मेसेज खूप गांभीर्याने घेतला होता, ते खूप घाबरले होते. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि मला सांगितलं की मी किती छान मुलगी आहे आणि ते किती वाईट आहेत. तसेच मी या सर्व गोष्टींचा विचार करू नये, असंही त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना हा विनोद असल्याचं म्हणाले होते.”