शाहरुख खान व गौरी खान यांची लेक सुहाना खान सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे, पण त्याआधीच तिला एक मोठी संधी मिळाली आहे. सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. या कार्यक्रमातील काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाच्या संदर्भात ही घोषणा करण्यात आली. सुहाना खान या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण त्याआधीच तिला एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमात पोहोचलेली सुहाना खूपच सुंदर दिसत होती.
या इव्हेंटमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात सुहानाने पहिल्यांदाच मीडियाशी संवादही साधला. सुहाना म्हणाली, “सर्वांना नमस्कार, मी येथे येऊन खूप उत्साहित आहे, या प्रोडक्टसाठी आम्ही जे काही शूट केले आहे ते तुम्ही लवकरच पाहावे, अशी माझी इच्छा आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून या ब्रँडचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे.”
सुहाना खान लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यामधून खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.