सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचेही लाखो चाहते आहेत. सुहाना या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या वेब सिरीजमधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. सुहाना सध्या लाइमलाइटमध्ये राहत असली तरी एकेकाळी तिच्या वडिलांच्या लोकप्रियतेचा तिला भयंकर तिरस्कार होता. एका मुलाखतीत सुहानानेच याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- “आलियाच्या लग्नाच्या खर्चासाठी…” मुलीच्या साखरपुड्याबद्दल समजताच अनुराग कश्यपची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सुहाना खानला आता प्रसिद्धीझोतात राहणे आवडते. पण एकेकाळी तिला याच लाइमलाइटचा प्रचंड राग येत होता. २०१८ मध्ये ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत सुहानाने सांगितले होते की, “मला आधीच वाटू लागले होते की आपले आयुष्य इतरांपेक्षा वेगळे आहे. माझे वडील इतके लोकप्रिय आहेत असे मला कधीच वाटले नव्हते. ते मला शाळेत सोडायला यायचे तेव्हा लोक आमच्याकडे टक लावून बघायचे.”
सुहाना पुढे म्हणाली, ‘मला आठवते की त्यांना माझे वडील म्हणून कोणीच हाक मारत नव्हते. पण माझी इच्छा होती की त्यांना माझे वडील म्हणून लोकांनी ओळखावे. जेव्हा ते मला मिठी मारायचे तेव्हा मी त्यांना परत गाडीत ढकलायचे. मला त्यांचा खूप तिरस्कार वाटत होता. या गोष्टीने मला खूप आत्मभान दिले. मला नंतर कळले की जेव्हा मी माझ्या वडिलांना मिठी मारते तेव्हा ते फक्त माझे वडील असतात एक प्रसिद्ध अभिनेता नाही.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’मधील ‘जय श्रीराम’ गाण्याच्या लॉन्चवेळी देवदत्त नागे झाला भावुक; म्हणाला, “मी अनेकदा…”
वयाच्या १६ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुहाना खान शिक्षणासाठी परदेशात गेली होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘वेगळ्या वातावरणात राहणे आणि इतक्या नवीन लोकांना भेटणे यामुळे मला आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली, अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबतही. जसे की रस्त्यावरून चालणे किंवा ट्रेनमधून प्रवास करणे. मुंबईत या गोष्टी करणे खूप अवघड होते, पण दूर राहिल्याने मला घरच्यांची किंमत कळाली.’