अभिनेता शाहरुख खानची लेक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिचा जाहिरात क्षेत्रात मोठी संधी मिळाली आहे. सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. तीन दिवसांपूर्वीच एक मोठा सोहळा पार पडला, तिथे सुहानाच्या नावाच्या घोषणा करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संधी मिळेल तेव्हा तुम्ही भारतीयत्व…”; पाकिस्तानी अभिनेत्याने प्रियांका चोप्रावर केली टीका, नेमकं काय घडलं?

दरम्यान, ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर सुहानाची पहिली जाहिरात प्रदर्शित झाली आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पहिली जाहिरात शेअर केली आहे. “‘मेबलिन’ न्यूयॉर्कचा नवीन चेहरा बनून या अमेझिंग महिलांसोबत स्क्रीन शेअर करण्यास मी खूप उत्साही आहे,” असं सुहानाने व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय. यात तिच्यासह पीव्ही सिंधू, अनन्या बिरला व एक्शा करंग आहेत.

सुहानाच्या या पोस्टवर तिची आई गौरी खानसह शनाया कपूर व श्वेता बच्चन यांनीही कमेंट्स केल्या आहेत. ‘मला हा मस्कारा आताच हवाय’, अशी कमेंट गौरी खानने केली आहे. तर, शनाया व श्वेता बच्चन यांनीही तिचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan first maybelline ad video gauri khan commented hrc