सध्या इतरांप्रमाणे बॉलिवूड कलाकारही सगळे सण अगदी धुमधडाक्यात साजरे करत आहेत. कोविडमुळे २ वर्षं एकमेकांपासून दूर राहून सण साजरे करणारे सेलिब्रिटी पुन्हा दिवाळी पार्टीजमध्ये दिसू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये चांगलंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. क्रीती सनॉनपासून मनीष मल्होत्रापर्यंत कित्येकांनी त्यांच्या घरी खासगी पार्टी आयोजित करून बॉलिवूडकरांना आमंत्रण दिलं आहे.

बॉलिवूडचा सर्वोत्तम फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या खासगी दिवाळी पार्टीची सगळीकडेच चर्चा होत आहे. या पार्टीत विकी-कतरिना, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सारा अली खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, सुहाना खान, अनन्या पांडे अशा कित्येकांनी हजेरी लावली. शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे या दोघी एकत्रच या पार्टीत दाखल झाल्या. सध्या सोशल मीडियावर दोघींच्या लूकची जबरदस्त चर्चा सुरू आहे. अनन्यापेक्षा सुहानाची जास्त प्रशंसा होत आहे. काहींनी सुहानाला आंटी म्हणून डिवचल तर काहींनी तिच्या या ग्लॅमरस लूकची तुलना थेट दीपिका पदूकोणशी केली आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमार व अजय देवगणच्या चित्रपटामध्ये शर्यत, ‘राम सेतु’, ‘थॅंक गॉड’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात

या ग्लॅमरस साडीमधले काही फोटोज नुकतेच सुहानाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान यांच्याबरोबर कित्येकांनी कॉमेंट करत सुहानाची प्रशंसा केली आहे. खुद्द शाहरुखने कॉमेंट करत म्हंटलं की, “साडी ही कालातीत आहे. आणि तू नेहमीप्रमाणेच मोहक आणि सुंदर दिसत आहेस. तू स्वतः साडी नेसलीस का?” असा प्रश्न शाहरुखने विचारल्यावर सुहानाने गौरी खानला टॅग करत तिने मदत केल्याचं स्पष्ट केलं आहे.

सुहानाच्या या फोटोवर अनन्या पांडे, मसाबा गुप्ता, श्वेता बच्चन नंदा यांनी कॉमेंट करत तिच्या लूकची प्रशंसा केली आहे. सुहाना लवकरच झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर खुशी कपूर आणि अगस्त्य नंदासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Story img Loader