६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा १७ ऑक्टोबरला दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. चित्रपट आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी भारत सरकारकडून गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनने मिळून ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्कारावर नाव कोरलं. दोघींचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलिया व क्रिती या भव्य सोहळ्याला साडी नेसून गेल्या होत्या. मात्र, आलिया भट्टच्या साडीने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं कारण, अभिनेत्रीने तिच्या लग्नातील साडी नेसून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आलियाने तिच्या लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेली ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी या पुरस्कार सोहळ्याला नेसली होती. आता आलियाच्या या कृतीचं किंग खानची लेक सुहाना खानने कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’मधील ती अवाढव्य गन कम्प्युटरवर बनवलेली नाही; ५०० कीलोचं ‘वॉर मशीन’ बनवायला लागले इतके महीने

आलियाची ही कृती कित्येकांना धडा देणारीच असल्याचं सुहानाने स्पष्ट केलं. आपल्या आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुहाना म्हणाली, “आलियाने तिच्या लग्नातील साडी पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला नेसली, आणि मला असं वाटतं की या एवढ्या मोठ्या मंचावर एक कलाकार म्हणून आलियाने दिलेला हा संदेश, हा धडा फार मोलाचा आणि महत्त्वाचा होता.”

पुढे सुहाना म्हणाली, “जर आलिया भट्ट तिच्या लग्नातील साडी पुन्हा नेसु शकते, तर आपणदेखील एखाद्या पार्टीतला ड्रेस पुन्हा नक्कीच परिधान करू शकतो. दरवेळी नवे कपडे आणि डिजायनर ड्रेस घ्यायची गरज असतेच असं नाही. नवे कपडे बनवण्यात बऱ्याच गोष्टींचा अपव्यय होतो अन् पाहायला गेलं तर ही गोष्ट पर्यावरणासाठीही फार हानिकारकच आहे. त्यामुळे आलियाची ही कृती फार महत्त्वाची होती.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan lauds alia bhatt reusing her wedding saree during national award ceremony avn
Show comments