अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सध्या चागंलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनन्याच्या मैत्रिणी सुहाना खान, शनाया कपूर पोहोचल्या होत्या. चित्रपट पाहिल्यानंतर सुहानाने प्रतिक्रिया दिली आहे. अनन्याच्या चित्रपटाबद्दल सुहाना काय म्हणाली, पाहुयात.

‘ड्रीम गर्ल २’ मध्ये नुसरत भरुचाला डावलून अनन्या पांडेला का घेतलं? आयुष्मान खुराना म्हणाला, “एका नव्या…”

‘इन्स्टंट बॉलीवूड’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुहाना हसत हसत पीव्हीआरमधून बाहेर पडताना दिसते. पापाराझींनी तिला चित्रपटाबद्दल विचारलं, तेव्हा सुहानाने आपली बेस्ट फ्रेंड अनन्याच्या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू दिला. अनन्याचा चित्रपट कसा वाटला? असं विचारल्यावर सुहाना म्हणाली, “खूप चांगला.”

यावेळी सुहाना खानने जीन्ससह ब्लॅक कलरचा सेक्सी क्रॉप टॉप घातला होता. तिचा मेकअप साधाच होता आणि केस तिने मोकळे सोडले होते. तिने तिचा लूक एका सुंदर हँडबॅगने पूर्ण केला होता. दरम्यान, ‘ड्रीम गर्ल २’ च्या स्क्रीनिंगमध्ये आदित्य रॉय कपूर देखील आला होता. आदित्य आणि अनन्या डेट करत असल्याच्या चर्चा आहेत, पण दोघांनीही त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी आणि सीमा पाहवा यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader