झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून शाहरुख खानची लेक सुहाना खान व अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सुहाना व अगस्त्यच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून या दोघांच्या सुरू झालेल्या अफेअरच्या चर्चा अजूनही रंगल्या आहेत. अशातच सुहाना व अगस्त्यचा नाइटक्लबमधील पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहितीनुसार, सुहाना खान व अगस्त्य नंदाचा व्हायरल झालेल्या व्हिडीओ हा लंडन येथील एका नाइटक्लबमधील आहे. दोघांचा व्हिडीओच नाही तर फोटो देखील व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत, सुहाना व अगस्त्य एकत्र आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ‘सिंधूताई माझी माई’नंतर किरण माने झळकणार ‘या’ नव्या मालिकेत, म्हणाले, “अत्यंत निर्दयी, क्रूर…”

सुहाना खान सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या नाइटक्लबमध्ये सुहाना, अगस्त्य वेदांत महाजनच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. या पार्टीला अजय देवगण व काजोलची मुलगी न्यासा देवगण देखील होती.

हेही वाचा – Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – Video: नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी वारासणीतून खरेदी केली साडी, सोन्या-चांदीचे वर्क असलेल्या साडीची किंमत जाणून घ्या

दरम्यान, सुहाना खान आणि अगस्त्य नंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सुहाना शाहरुख खानबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘किंग’ असून सुजॉय घोष यांचं दिग्दर्शन करत आहेत. तर अ‍ॅक्शन सीन्सची जबाबदारी सिद्धार्थ आनंद यांच्यावर आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांना लागली हळद, फोटो आले समोर

तसंच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा लवकरच धर्मेंद्र आणि जयदीप अहलावतबरोबर श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्यने लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhana khan spotted with rumoured bf agastya nanda video viral pps