Suhana Khan Viral Video: शाहरुख खानची लेक सुहाना खान नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून सुहाना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला डेट कर असल्याची चर्चा आहे. दोघं नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. तसंच दोघं एकत्र पार्टीही करतात. सुहाना व अगस्त्यचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होतं असतात. सध्या सुहानाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतीच सुहाना खान मित्रांबरोबर पार्टी करताना दिसली होती. वर्सोवा येथील एका कॅफेमधून ती बाहेर पडताना पापाराझींनी तिला स्पॉट केलं होतं. यावेळी पापाराझी आणि चाहत्यांची सुहानाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.
‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर सुहाना खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी व चाहत्यांच्या गर्दी अडकलेली सुहाना पाहायला मिळत आहे. यावेळी सुहानाच्या मदतीला तिचे दोन मित्र पुढे येतात आणि तिला त्या गर्दीतून बाहेर काढून गाडीत बसवतात. तेव्हा सुहानाचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदादेखील असतो. पण तो सुहानाच्या मदतीला न येता. तिच्यानंतर कॅफेतून बाहेर पडतो आणि थेट निघून जातो.
सुहाना खान व अगस्त्य नंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघांनी २०२३मध्ये झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील सुहाना व अगस्त्यच्या अभिनयाच भरभरून कौतुक करण्यात आलं. ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासून सुहाना व अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. पण ‘द आर्चीज’च्या प्रदर्शनानंतर सुहाना व अगस्त्यच्या अफेअरच्या चर्चांना अधिक उधाण आलं. मात्र, अजूनपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.
दरम्यान, सुहाना लवकरच शाहरुख खानसह ‘द किंग’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रकरण काही दिवसांत सुरू होईल. तसंच अगस्त्य ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्यने लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.