अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना आणि मुलगा आर्यन खान दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असतात. सुहाना लवकरच द आर्चीज नावाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती बॉलिवूड पार्टीज आणि इव्हेंट्सला हजेरी लावत असते. तिचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत. सुहाना तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सुहानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुहाना खानने शुक्रवारी रात्री काजल आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत सुहानाशिवाय तिचा भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान देखील हजर होते. या तिघांनीही आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पार्टीमध्ये सुहाना स्लीव्हलेस स्किन टाईट शॉर्ट ड्रेसमध्ये तिची हॉट आणि स्लिम बॉडी फ्लाँट करताना दिसली. लाइट पार्टी मेकअप करत तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ब्लॅक क्लच कॅरी केला होता.
‘सुहाना खूपच सुंदर दिसतेय’, ‘अगदी तिच्या वडिलांसारखी दिसतेय’, ‘खूप हॉट दिसतेय’, ‘सुहाना अगदी बॉलिवूड अभिनेत्रींसारखी दिसते’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.