प्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम यांची पत्नी व अभिनेत्री सुहासिनी मणीरत्नम या सध्या चर्चेत आहेत. भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बोल्ड कंटेंट तसेच बॉलिवूड स्टार्स यांच्यावर सुहासिनी यांनी टिप्पणी केली आहे. अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीन्स देणं थांबवायला हवं असं मत सुहासिनी यांनी मांडलं आहे. इतकंच नव्हे तर आपले पती मणीरत्नम यांच्या दोन चित्रपटांवरही भाष्य केलं आहे.

मणीरत्नम यांचे ‘दिल से’ व ‘बॉम्बे’ हे दोन्ही चित्रपट चांगले गाजले. या दोन्ही चित्रपटात देशातील राजकीय परिस्थितिवर भाष्य करण्यात आलं होतं. त्या काळात अत्यंत वादग्रस्त मुद्द्यांवर हे चित्रपट बेतलेले होते. आजच्या युगात मात्र तसे चित्रपट पुन्हा काढता येणं कठीण आहे असं मत सुहासिनी यांनी मांडलं आहे. याबरोबरच सध्याचे कलक्षेत्र व राजकारण या दोन्हीवर सुहासिनी यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : Animal Trailer : ‘या’ दिवशी येणार रणबीर कपूर व रश्मिका मंदानाच्या ‘बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर; चाहते उत्सुक

एबीपी लाईव्हच्या एका कार्यक्रमात सुहासिनी यांनी हजेरी लावली अन् वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने जेव्हा सध्याच्या राजकीय परिस्थिति व चित्रपटक्षेत्र यावर प्रश्न विचारताना मणीरत्नम यांच्या ‘दिल से’ व ‘बॉम्बे’सारख्या चित्रपटांबद्दल विषय निघाला अन् यावेळी आजच्या वातावरणात खुद्द मणीरत्नम हे दोन्ही चित्रपट बनवू शकतील का याबद्दल विचारणा झाली.

त्यावेळी शबाना आजमी यांनी सांगितलेली एक गोष्ट सुहासिनी यांनी मांडली. शबाना एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या की शोलेसारखा चित्रपटही आजच्या साच्यात बसवून पुन्हा साकारला जाऊ शकत नाही. सुहासिनी यांच्या बोलण्याचा रोख अगदी स्पष्ट होता तो म्हणजे आजच्या राजकीय वातावरणात मणीरत्नम हे पुन्हा ‘दिल से’ किंवा ‘बॉम्बे’सारखे चित्रपट करू शकणार नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे.

Story img Loader