‘प्रतिघात’ या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत काम करीत सुजाता मेहता(Sujata Mehta) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सुजाता मेहता ‘कंवरलाल’, ‘यतीम’ या १९८८ सालच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या. इतरही अनेक चित्रपटांत त्यांनी कामे केली. सुजाता मेहता यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्याबरोबरच अनेक अभिनेत्यांसह काम केले. जितेंद्र, सनी देओल, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली. आता एका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शाहरुख खान व आमिर खान यांना भेटण्याचा अनुभव कसा होता, यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या सुजाता मेहता?

‘हिंद रश’ला दिलेल्या एका मुलाखतीत सुजाता मेहता यांनी म्हटले, “चित्कार या नाटकात मी काम करत होते. त्यावेळी तो बॅकस्टेजला काम करत असे. मी जेव्हा शोमध्ये काम करत होते, त्यावेळी आमिर खानचे ट्रेनिंग चालले होते. आमिर खानने बॅकस्टेजला लोकांना पाणी दिले आहे. त्याने खडतर मेहनत घेत प्रशिक्षण घेतले आणि तो टॉप अभिनेत्यांपैकी एक झाला. इतक्या वर्षांनंतर इतके यश मिळाल्यानंतरही तो कुठून आला आहे, हे तो विसरला नाही. एकदा मी पृथ्वी थिएटरला गेले होते, त्यावेळी तो उठून उभा राहिला. धर्मेंद्रला जितका आदर दिला तितकाच आदर त्याने मलाही दिला. तो खानदानी आहे. बॅकस्टेजला काम करत असताना त्याने माझे ‘चित्कार’चे शो अनेकदा पाहिले आहेत.”

nana patekar talked about manisha koirala
“तिचा फोन नंबर…”, मनीषा कोईरालाबद्दल विचारल्यावर काय म्हणालेले नाना पाटेकर? एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या होत्या चर्चा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ramesh Bhatkar
लग्नाच्या वेळी अभिनेते रमेश भाटकरांकडे होता फक्त १६ रुपये बँक बॅलन्स; मृदुला भाटकर म्हणाल्या, “प्रेम असेल तर…”
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
“सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”
sujata mehta
मिथुन चक्रवर्तींबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अस्वस्थ होत्या श्रीदेवी; सुजाता मेहता आठवण सांगत म्हणाल्या, “ती एका कोपऱ्यात…”
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

शाहरुख खानबरोबरच्या भेटीची आठवण सांगताना सुजाता मेहता यांनी म्हटले, “मी शाहरुख खानला एकदा फिल्मसिटीमध्ये भेटले होते. तो त्याच्या त्याच्या वेशभूषेत असतो, तेव्हा तो अगदी सामान्य दिसतो. एकदा त्याला पाहिल्यानंतर तो शाहरुख आहे की नाही, याची मला खात्री होत नव्हती. मी तिथेच शूटिंग करत होते, त्याने मला ओळखले आणि तो खूप प्रेमळपणे बोलला. त्यानंतर पुन्हा एकदा माझी व शाहरुखची मेहबूब स्टुडिओमध्ये भेट झाली होती. तो खूप मेहनती व जमिनीवर पाय असणारा अभिनेता आहे.”

हेही वाचा: The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…

याच मुलाखतीत सुजाता मेहता यांनी शाहरुख खानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी गुजराती चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सुजाता मेहता या स्टार प्लसवरील लोकप्रिय ठरलेल्या सरस्वतीचंद्र या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

Story img Loader