बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पटियाला कोर्टाने या प्रकरणात जॅकलिनला दुबईला जाण्याची परवनागी शुक्रवारी(२७ जानेवारी) दिली आहे. यामुळे जॅकलिनला कॉन्फरन्ससाठी दुबईला जाता येणार आहे.
२०० कोटी घोटाळा प्रकरणात आरोपी असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. सुकेशशी जॅकलिनचे प्रेमसंबंध असल्याचे चौकशीत समोर आले होते. रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे सुकेशने मान्य केले होते.
हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’चं यश पाहून गौरी खान झाली भावूक; सुहाना व आर्यनची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनबरोबरच नोरा फतेहीचं नावही या प्रकरणात आहे. सुकेशने अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात ओढलं होतं. काहीच दिवसांपूर्वी जॅकलिन व नोराने सुकेशविरोधात जबाब नोंदवला होता.
दरम्यान, जॅकलिनला पटियाला कोर्टाकडून मिळालेल्या दिलास्यामुळे तिला दुबईला प्रवास करता येणार आहे. २७ ते ३० जानेवारी दरम्यान पेप्सिको इंडिया कॉन्फरन्ससाठी जॅकलिन दुबईला जाणार आहे.