सुकेश चंद्रशेखर २०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी सध्या तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. सुकेशने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना जाळ्यात ओढलं होतं. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावंही सुकेश प्रकरणात समोर आली होती. नोरा फतेही व जॅकलिन फर्नांडिसशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं.
नोरा फतेही व जॅकलिनने सुकेश विरोधात साक्ष दिली होती. सुकेशने आमिष दाखवून फसवल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, सुकेशने हे आरोप फेटाळून लावले होते. नोराने सुकेशवर आरोप करत त्याने घर देण्याचं वचन दिल्याचं म्हटलं होतं. पण त्याने फसवणूक केल्याचा आरोप नोराने केला होता. तर नोराला घर खरेदी करण्यासाठी पैसे तर बीएमडब्ल्यू गाडी गिफ्ट दिल्याचा खुलासा सुकेशने केला होता. आता सुकेशने नोराचा ‘गोल्ड डिगर’ असा उल्लेख केला आहे.
हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा, म्हणाला “तुम्ही ज्याच्यावर…”
सुकेशला नुकतंच दिल्लीतील एका कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी त्याला नोरा फतेहीने लावलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुकेशने म्हणाला, “मी गोल्ड डिगरबाबत काहीही बोलणार नाही”. तर जॅकलिन फर्नांडिसला सुकेशने व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा>> “ऐतिहासिक क्षण…” शिव ठाकरेबरोबरचा ‘तो’ फोटो शेअर करत ‘बिग बॉस’ विजेत्या एमसी स्टॅनची पोस्ट
नोरा फतेही जॅकलिनचा तिरस्कार करत असल्याचं सुकेशने म्हटलं होतं. रोज १० वेळा फोन करुन जॅकलिनविरोधात ब्रेन वॉश करत असल्याचा खुलासाही सुकेशने केला होता. नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसबरोबर सारा अली खान, चाहत खन्ना यांची नावंही सुकेश प्रकरणात समोर आली होती.