२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर अनेक अभिनेत्रींच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर अभिनेत्री नोरा फतेहीने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याविरोधात साक्ष दिली होती. सुकेशने घर देणार असल्याचं वचन दिलं होतं, असा खुलासा नोराने केला होता. नोराने केलेले आरोप सुकेशने फेटाळून लावले आहेत.

सुकेश चंद्रशेखरने त्यांच्या वकिलांमार्फत पुन्हा पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने नोरा फतेहीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. “मी तिला घर देणार असल्याचं वचन दिल्याचं नोराने सांगितलं. पण, तिने माझ्याकडून आधीच घरासाठी मोठी रक्कम घेतली आहे. कुटुंबियांसाठी मोरोक्को येथे घर खरेदी करण्यासाठी नोराने माझ्याकडून पैसे घेतले होते. ईडीच्या कायद्यातून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी नोरा असं म्हणत आहे”, असं त्याने म्हटलं आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

हेही वाचा>> ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढल्यानंतर नैराश्यात गेलेले किरण माने, खुलासा करत म्हणाले “मला आत्महत्या…”

नोरा खोटं बोलत असल्याचा दावा सुकेशने केला आहे. “नोराने नोंदवलेल्या जबाबात असा दावा केला आहे की, तिला गाडी नको होती. पण हे खोटं आहे, ती स्वत: तिची गाडी बदलण्यासाठी माझ्या मागे लागली होती. त्यावेळी तिच्याकडे मर्सिडीजची CLA गाडी होती. पण ती फार स्वस्त आहे असं तिला वाटायचं. माझ्या चॅट्स आणि स्क्रीनशॉट्स ईडीकडे आहेत. त्यामुळे त्यात काही खोटे नाही. खरंतर मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण त्यावेळी त्या गाड्या उपलब्ध नव्हत्या आणि तिला लगेचच गाडी हवी होती. त्यामुळे मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज ही गाडी घेऊन दिली. ही गाडी तिने बराच काळ वापरली. नोरा ही भारतीय नाही. त्यामुळे तिने या गाडीची नोंद तिच्या एका मैत्रिणीचा पती बॉबीच्या नावे केली होती”, असंही सुकेशने म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘तारक मेहता…’ मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार, दिशा वकानी व ‘बाघा’चा फोटो व्हायरल

दरम्यान, २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

Story img Loader