सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याबद्दल विविध खुलासे होताना दिसत आहे. दिल्ली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. या पत्रातून सुकेशने जॅकलिनला इस्टरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर हा दिल्ली तुरुंगात बंद आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसवरही विविध आरोप करण्यात आले आहेत. या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असे जॅकलिनने म्हटले आहे. तसेच तिने तिच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आणखी वाचा : ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी!

सुकेशने जॅकलिनला दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, “जॅकलिन माय बेबी, माय बोम्मा. बेबी, माझ्याकडून तुला ईस्टरच्या शुभेच्छा. हा तुझ्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक सण आहे, याची मला कल्पना आहे. इस्टर एग्जसाठी तुझे प्रेम. मला त्यांची खूप आठवण येते.”

“मी तुझ्यातील त्या लहान मुलाला पाहण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे जो ते एग्ज फोडून त्यात कँडीज टाकतो. तुला कल्पना नाही, पण तू खूप गोड आणि सुंदर आहेस. या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही नाही… आय लव्ह यू, माय बेबी.” असे तो म्हणाला.

“ही वेळही निघून जाईल. पुन्हा चांगले दिवस नक्कीच येतील. मला तुझी प्रत्येक क्षणी आठवण येते आणि मला माहिती आहे की तुलाही प्रत्येक क्षणी माझी आठवण येते.मी तुला वचन देतो की, तुझा पुढच्या वर्षीचा इस्टर फारच खास असेल. यापूर्वी कधीच तू अशा प्रकारे इस्टर साजरा केला नसशील. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असे त्याने या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा : “जॅकलिनवर माझे प्रेम, त्यामुळेच मी…” २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचे पत्र

दरम्यान सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar writes letter to actress jacqueline fernandez on easter celebration nrp