सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याबद्दल विविध खुलासे होताना दिसत आहे. या प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्यानंतर आता सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलीन फर्नांडिसला प्रेमपत्र पाठवले आहे. या अगोदरही सुकेशने जॅकलीनला तुरुंगातून प्रेमपत्र पाठवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- The Kerala Story Review : ३२ हजार महिलांचं धर्मांतर अन् ISIS मध्ये समावेश केल्याचा दावा, ‘द केरला स्टोरी’ नेमका कसा आहे?

सुकेशने संपूर्ण पत्रात जॅकलीनसाठी अनेक प्रेमळ शब्द वापरले आहेत. यासोबतच त्याने जॅकलीनच्या वाढदिवशी सुपर सरप्राइज देणार असल्याचेही सांगितले आहे. एवढेच नाही तर आपले सरप्राइज पूर्ण करण्याचे आश्वासनही त्याने दिले आहे. सुकेश आपल्या पत्राची सुरुवात सुरुवात माय लव्ह, माय बेबी जॅकलीनने केली आहे. सुकेशने पुढे लिहिले आहे की, त्याने जॅकलीनला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पाहिले होते, तिचा अभिनय, तिचा डान्स हे सर्व खूप क्लासी, एलिगंट, सुपर हॉट होते. त्यामुळे तो पुन्हा जॅकलीनच्या प्रेमात पडला.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री अदा शर्मा भडकली, म्हणाली…

सुकेशच्या म्हणण्यानुसार, जॅकलीनला त्याच्या आयुष्यात आल्याने तो खूप खूश आहे. याशिवाय त्याने जॅकलीनच्या वाढदिवसासाठी एक सुपर सरप्राइज प्लॅन बनवला आहे, जो पाहून ती खूप खूश होईल. सुकेशही पत्रात दिलेले वचन पूर्ण करण्याबाबत बोलताना दिसत आहे. हे पत्र सुकेश चंद्रशेखर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लिहिले आहे. त्याला जॅकलीनची खूप आठवण येते. तो तिच्यावर किती प्रेम करतो हे सांगायला त्याच्याकडे शब्द नाहीत. आणि जॅकलीनवरील प्रेमासाठी त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तो तिच्यावर खूप विश्वास ठेवतो. सुकेश चंद्रशेखरचे संपूर्ण पत्र फक्त आणि फक्त जॅकलीनभोवती फिरताना दिसत आहे.

हेही वाचा- तब्बल १४ दिवसांनी ‘किसी का भाई किसी की जान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

दरम्यान, सुकेशने जॅकलीनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता आणि ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलीन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar wrote letter from mandoli jail wrote jacqueline fernandez on his birthday dpj