५०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला एका विदेशी क्रमांकावरुन अनेक मेसेज केले होते. जॅकलीनने ब्लॅक कलरचा सूट घालून कोर्टात यावं अशीही विनंती त्याने केली होती. या प्रकरणात आता जॅकलीनने पोलिसात तक्रार केली आहे. सुकेश मला धमकावत असल्याचं तिने म्हटलं आहे. दिल्लीतल्या तिहार आणि त्यानंतर मंडोली या तुरुंगातून जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरने अनेक मेसेज केले आहेत. व्हॉट्स अॅपवर आलेल्या एकाही मेसेजला जॅकलीनने उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर त्याने तिला ऑडिओ मेसेजही पाठवले.
सुकेश का झाला नाराज?
सुकेशने सांगितल्याप्रमाणे जॅकलीन ब्लॅक सूट घालून आली नाही. त्यामुळे सुकेश नाराज झाला, चिडला आणि त्याने पुन्हा तिला मेसेज पाठवले. ५०० कोटींहून अधिक रकमेचा गोलमाल केल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरवर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन जॅकलीनला मसेज पाठवत तुरुंग प्रशासनाची एक प्रकारे खिल्लीच उडवली आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
जॅकलीनने सुकेशच्या या सगळ्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर कोर्टातून सुकेश चंद्रशेखरने WebEx चॅट रुम मधून तिला मेसेज करण्यास सुरुवात केली. सुकेश जॅकलीनला वारंवार आय लव्ह यू म्हणत होता. मात्र जॅकलीनने एकाही मेसेजला उत्तर दिलं नाही त्यावेळी त्याने अप्रत्यक्षरित्या तिला धमक्याही दिल्या.
हे पण वाचा- Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस ईडीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात, २०० कोटी प्रकरणात दिलासा मिळणार?
सुकेशच्या या मेसेजना कंटाळून जॅकलीनने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याविषयी तक्रार केली आहे. जॅकलीनने दिल्ली पोलिसांना सांगितलं की २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात मी साक्षीदार आहे. सुकेशला शिक्षा व्हावी यासाठी मी साक्ष देणार आहे असंही तिने म्हटलं आहे. तसंच जॅकलीनने सुकेशचे काही कारनामेही उघड केले आहेत. तसंच तिने हा दावाही केला आहे की सुकेश तिला तुरुंगातून धमक्या देत आहे आणि मानसिक त्रास देतो आहे. कोर्टाने या प्रकरणी तुरुंग प्रशासन आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे.
जॅकलिनच्या आयुष्यात सुकेश कसा आला?
डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.
जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे. हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.
यानंतर जॅकलिन आणि शेखर (सुकेश) यांच्यात बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे बोलणं वाढलं. या बोलण्यातून सुकेशने जॅकलिनला किती थापा मारल्या माहित नाही. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी माझं नातं आहे अशी थाप सुकेशने मारली होती. त्यानंतर मी सन टीव्हीचा मालक आहे असंही त्याने जॅकलिनला सांगितलं होतं. मात्र त्याने या सगळ्या थापा मारल्या होत्या.