बॉलीवूडमधील अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीचा आज वाढदिवस आहे. २२ ऑगस्ट १९६५ रोजी जन्मलेली माना तिचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ती केवळ एक यशस्वी बिझनेसवूमन नाही तर एक सामाजिक कार्यकर्ती आणि रिअल इस्टेट क्वीन देखील आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील काही खास किस्से तसेच तिची व सुनीलची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
माना शेट्टीचे नाव मोनिशा कादरी आहे. सुनील शेट्टी आणि मानाची पहिली भेट एका पेस्ट्री शॉपमध्ये झाल्याचे बोलले जाते. सुनील तिच्या प्रेमात पडला आणि तिच्या जवळ जाण्यासाठी त्याने मानाच्या बहिणीशी मैत्री केली. यानंतर दोघेही अनेकदा ग्रुपमध्ये भेटायचे. कालांतराने माना व सुनील यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.
‘गदर २’ पाहिल्यानंतर हेमा मालिनींनी केलं कौतुक; सनी देओलने सावत्र आईचा फोटो केला शेअर
माना आणि सुनील शेट्टीने एकमेकांना वर्षे डेट केलं. सुनील शेट्टी दक्षिण भारतीय कुटुंबातील आहे, तर माना गुजराती मुस्लीम कुटुंबातील आहे. तिची आई पंजाबी व वडील मुस्लीम होते. धर्म वेगळे असल्यामुळे सुनीलचे वडील या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते. मात्र, दोघांचं एकमेकांवरचं प्रेम पाहिलं आणि काही काळाने त्याचे वडील या लग्नासाठी तयार झाले. २५ डिसेंबर १९९१ रोजी माना व सुनील यांनी लग्नगाठ बांधली होती.
माना शेट्टीने तिचा पती सुनील शेट्टीबरोबर मुंबईत S2 नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प बनवला होता. ज्या अंतर्गत त्यांनी २१ लक्झरी व्हिला बांधले आहेत. याशिवाय, ती लाइफस्टाइल स्टोअरची मालकीण आहे आणि ‘सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया’ नावाच्या एनजीओशीही जोडलेली आहे. दरम्यान, सुनील व मानाला अथिया व अहान ही दोन अपत्ये आहेत. यावर्षीच्या सुरुवातीलाच त्यांची लेक अथियाचं लग्न क्रिकेटपटू केएल राहुलशी झालं.