बॉलिूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल बऱ्याच काळपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या नात्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपासून हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशात आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांवर अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाबाबत महत्त्वाची माहिती त्यानं यावेळी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील शेट्टीने अलिकडेच क्राइम थ्रीलर वेब सीरिज ‘धारावी बँक’च्या लॉन्चसाठी हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कार्यक्रमात सुनील शेट्टीला लेकीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील शेट्टीने अथिया आणि राहुल लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा- “ऋषभ पंतच्या बाजूने उर्वशीसाठी…” शुबमन गिलने उघड केलं नात्याचं सत्य, व्हिडीओ चर्चेत

अथिया- राहुल लग्न कधी करणार असा प्रश्न जेव्हा सुनील शेट्टीला विचारण्यात आला तेव्हा त्याने, “लवकरच त्यांचं लग्न होईल” अशी प्रतिक्रिया दिली. हे उत्तर देतानाच त्याने या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना पुष्टी दिली. तसेच दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी जेव्हा सुनीलला एका मुलाखतीत अथिया- राहुलच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा, “मुलांना कधी लग्न करायचं हे ते स्वतःच ठरवतील.” अशी प्रतिक्रिया दिली होती.

आणखी वाचा- अथिया शेट्टीच्या वाढदिवशी केएल राहुलने केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या असण्यानं…”

दरम्यान अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यावेळी केएल राहुलने अहान शेट्टीच्या ‘तडप’ चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. राहुल आणि अथियाने या प्रीमियरला एकत्र पोज दिली होती. त्यानंतर दोघंही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. अलिकडेच सुनील शेट्टीही केएल राहुलचा सामना पाहण्यासाठी गेला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suniel shetty reacts on daughter athiya shetty and kl rahul wedding mrj