१९९० च्या दशकात सुनील शेट्टी बॉलीवूडमध्ये मोठं नाव होतं. त्याने १९९१ साली ‘एक और फौलाद’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, मात्र हा चित्रपट कधीही प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर १९९२ मध्ये ‘बलवान’ हा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये त्याने दिव्या भारतीबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले आणि सुनील शेट्टी रातोरात स्टार बनला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे, जिथे अनेक मोठे कलाकार आपल्या करिअरच्या सुरुवातीला आपली लव्ह लाइफ गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, तिथे सुनील शेट्टीने त्याच्या पहिल्या चित्रपटाबरोबरच एक मोठा निर्णय घेतला होता. त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच गर्लफ्रेंड माना शेट्टीशी लग्न केले, बॉलीवूडमध्ये सुनील शेट्टीची तेव्हा सर्वांशी चांगली ओळख होती, असं असूनसुद्धा त्याच्या लग्नात फक्त एकाच स्टारने हजेरी लावली होती.

हेही वाचा…अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याविषयी मांडले होते मत; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”

सुनील शेट्टीच्या लग्नात हजेरी लावणारा एकमेव स्टार : सलमान खान

सुनील शेट्टीचे बॉलीवूडमधील सर्वांशी चांगले संबंध होते. .मात्र, त्याच्या आयुष्यातील मोठ्या आनंदाच्या क्षणी, त्याच्या लग्नात सलमान खान हा एकमेव बॉलीवूड स्टार उपस्थित होता.

सलमान खान आणि सुनील शेट्टी यांची मैत्री दोन दशकांहून अधिक काळ टिकली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझ्या लग्नात फक्त सलमान खान आणि त्यांचा भाऊ सोहेल आले होते. ते दोघेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.”

हेही वाचा…‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

सुनील शेट्टीने दिला होता सलमान खानला आधार

एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानने सांगितले होते की, “जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा मी सुनील शेट्टीच्या दुकानात गेलो होतो आणि त्याने मला एक शर्ट दिला. एवढंच नाही, तर त्याने मला त्याच्या घरी नेलं आणि मला एक वॉलेट गिफ्ट केलं.”

हेही वाचा…‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”

सुनील शेट्टी आणि सलमान खान यांच्यातील ही मैत्री आजही टिकून आहे. सुनील शेट्टीचा दुसरा जवळचा मित्र साजिद नाडियाडवाला आहे, त्याने सुनीलचा मुलगा अहान शेट्टीला बॉलीवूडमध्ये लाँच केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suniel shetty unbreakable bond with salman khan the only star attended his wedding psg