‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ अशी पात्रं साकारून लोकप्रिय झालेला सुनील ग्रोवर सध्या टीव्हीवर दिसत नाहीये. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये वेगवेगळी पात्रं साकारून तो घरोघरी पोहोचला होता. पण नंतर कपिलबरोबर झालेल्या वादामुळे त्याने हा शो सोडला होता. सुनील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेक मजेदार फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video: अजय देवगणसाठी मराठी माणूस मागतोय भीक; म्हणाला, “मी भीक मागून पैसे पाठवेन पण तू…”

पोस्टमध्ये तो कधी दूध विकताना दिसतो. तर कधी शेंगदाणे विकताना दिसतो. एका फोटोमध्ये तो कांदे-बटाटे विकताना दिसला होता. आता त्याने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मक्याची कणिसं विकताना दिसत आहे. ‘पुढील मिशन शोधत आहे’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

काहींनी कपिल शर्मा शोमध्ये तू कधी परत येशील, असे प्रश्न विचारले आहेत. तर कॉमेडियन श्याम रंगीलाने ‘एखाद्या व्यवसायात काही दिवस टिक भावा, रोज व्यवसाय बदलशील तर कसं होईल,’ असं म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे.