दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझरवेळी मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये लोकांना अजिबात पसंत पडली नव्हती. त्यामानाने या चित्रपटाच्या ट्रेलरचे लोकांनी चांगलेच कौतुक केले आहे. ट्रेलरमधील काही सीन्सवर लोकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी लोकांना हा ट्रेलर आवडला आहे.
आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी वक्तव्य केले आहे. सुनील लहरी हा ट्रेलर पाहून नाराज झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आज तक.इन’शी संवाद साधताना सुनील लहरी यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, “ट्रेलर आधीपेक्षा चांगला आहे, पण यातून रामायण अधिक मॉडर्न स्वरूपात सादर केले जाणार असे वाटत आहे. प्रत्येकाचा विचार आणि दृष्टिकोन वेगळा असतो, पण रामायणाच्या बाबतीत लोकांच्या मनात जी भावना आहे तिला धक्का लागता कामा नये.”
आणखी वाचा : ‘The Kerala Story’ची टीम घेणार यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा
पुढे या ट्रेलरमध्ये खटकलेल्या गोष्टींबद्दल बोलताना ते म्हणाले, “यातील काही गोष्ट मला खटकल्या. हनुमानाच्या पाठीवर बसून श्रीराम यांना बाण सोडताना दाखवण्यात आले आहे. मी आजवर जेवढा रामायणाचा अभ्यास केला आहे त्यात असा प्रकार मी कुठेच ऐकलेला किंवा वाचलेला नाही. हनुमानांच्या आग्रहाखातर राम आणि लक्ष्मण हे त्यांच्या खांद्यावर बसतात, पण पाठीवर बसून बाण सोडतात हे माझ्या तरी ऐकिवात नाही.”
याबरोबरच सुनील लहरी यांनी या मुलाखतीमध्ये ट्रेलरमधील पात्रांच्या वेशभूषेवरही टीका केली आहे. वनवासादरम्यान श्रीराम यांना पूर्ण कपडे परिधान केलेले दाखवणे त्यांना खटकले आहे. त्या वेळी त्यांनी केवळ भगवी वस्त्रेच परिधान केल्याचे सुनील लहरी यांनी सांगितले आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.