हिंदी चित्रपटसृष्टीतील तगड्या कलाकारांचा उल्लेख केला तर त्यात सुनील शेट्टी यांच्या नावाचा समावेश होतो. सुनील शेट्टी त्यांच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. त्यांचा नम्रपणा आणि स्पष्टवक्तेपणा अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. सुनील शेट्टी यांची दोन्ही मुलं परदेशी शाळेत शिकली. त्यांनी त्यांच्या मुलांना भारतीय शाळेत का घातलं नाही याचं कारण आता त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील शेट्टी यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव अथिया शेट्टी आणि मुलाचं नाव अहान शेट्टी आहे. त्यांची ही दोन्ही मुलं अमेरिकन बोर्डाच्या शाळेत शिकली. त्यांच्या मुलांना त्यांनी अमेरिकन बोर्डाच्या शाळेत घालण्याचं आधीच ठरवलं होतं असं त्यांनी नुकतंच सांगितलं. हे सांगत असताना त्यांनी यामागील कारणही स्पष्ट केलं.

आणखी वाचा : Video: सुनील शेट्टी यांचा मराठमोळा अंदाज चर्चेत, म्हणाले, “उद्या आम्ही सर्वजण…”

ते म्हणाले, “मी आधीच ठरवलं होतं की माझ्या मुलांना मी भारतीय शाळेत घालणार नाही. ज्या शाळेचं नेतृत्व अमेरिकन बोर्ड करत असेल अशा शाळेमध्ये मी माझ्या मुलांना पाठवेन. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कोणीही विशेष वागणूक देऊ नये अशी माझी इच्छा होती. मला त्यांना अशा जगात पाठवायचं होतं ज्यात ते कोण आहेत याचा कोणालाही फरक पडणार नाही. मी हा निर्णय घेतल्यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की यात भरपूर खर्च येईल. पण मी त्यांना तयार केलं.”

हेही वाचा : घरात हटके वस्तू, बाहेर हिरवंगार लॉन…; अथिया-राहुलचा लग्नसोहळा होणाऱ्या सुनील शेट्टींच्या आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल

सुनील शेट्टी यांनी कधीही त्यांच्या मुलांना मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी सांगितलं नाही. मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय हा पूर्णपणे त्यांच्या मुलांचा होता. अथियाने शिक्षण सुरू असतानाच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि तसं तिने तेव्हा तिच्या वडिलांनाही बोलून दाखवलं होतं. नंतर तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी प्रवेश मिळवला. २०१५ साली अथियाने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर अहान शेट्टीने ‘तडप’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil shetty never wanted to admit their children in indian school know the reason rnv
Show comments