अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल उद्या विवाहबद्ध होणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नापूर्वीच्या सर्व समारंभांना सुरुवात झाली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर हे लग्न होणार आहे. त्यांच्या बंगल्याचे आणि बंगल्याला केलेल्या डेकोरेशनचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुनील शेट्टी जातीने लग्नाची तयारी कुठपर्यंत आली हे पाहायला त्यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर आले. यावेळी मीडिया फोटोग्राफर्सच्या प्रश्नाला त्यांनी मराठीत उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्या लग्न आहे आणि तरीही आजपर्यंत अथिया आणि राहुल बंगल्यावर येताना दिसले नाहीत. त्यांची झलक पाहण्यासाठी मीडिया फोटोग्राफर्स सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्या बाहेर थांबले होते. त्यांना पाहून सुनील शेट्टी स्वतःला रोखू शकले नाहीत. ते त्या मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधायला आले. या वेळेचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : विकी-कतरीनाच्या पावलावर पाऊल ठेवत अथिया शेट्टी-के.एल राहुलने लग्नाबाबत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

यात सुनील शेट्टी यांनी मराठीतून मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधला. ते म्हणाले, “आम्ही कोणीच इथे आत्ता नाहीयोत. उद्या आम्ही सर्वजण इथे येणार. तेव्हा मी त्या दोघांनाही तुमच्याकडे नक्की घेऊन येणार. तेव्हा तुम्हाला आम्हाला जे प्रश्न विचारायचा आहेत ते विचारा.” याचबरोबर त्यांनी मीडिया फोटोग्राफर्सनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. तसंच मीडिया फोटोग्राफर्सची तिथे गैरसोय होणार नाही, याकडेही तेथील कर्मचाऱ्यांना लक्ष द्यायला सांगितलं. सुनील शेट्टी यांच्या या नम्रपणाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं आहे.

हेही वाचा : घरात हटके वस्तू, बाहेर हिरवंगार लॉन…; अथिया-राहुलचा लग्नसोहळा होणाऱ्या सुनील शेट्टींच्या आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल

दरम्यान अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते एकत्र फिरतानाही दिसले. आता उद्या त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. अथिया आणि राहुलच्या लग्नात बॉलिवूड कलाकरांसह क्रिकेटर्सही हजेरी लावणार आहेत.