Govinda Sunita Ahuja Divorce: अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर तब्बल ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत. एका मराठी अभिनेत्रीशी गोविंदाची जवळीक या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. गोविंदाच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीची चर्चा होऊ लागली आहे. पुढच्या जन्मी हा नवरा नको, तसेच गोविंदा खूप मागास विचारांचा होता, असं सुनीता आहुजा म्हणाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लोक तुमच्या पाठीमागे काय करतात हे तुम्हाला कधीच कळत नाही. पुरुषांवर कधीही विश्वास ठेवू नका. ते सारखे बदलत असतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. आधी तरी तो कुणाबरोबर गेला नाही, आताचं मी सांगू शकत नाही,” असं सुनीता हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

सुनीताने याच मुलाखतीत ती व गोविंदा वेगळे राहतात, असा खुलासा केला होता. “आमची दोन घरं आहेत. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो. त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो १० लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसतो. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी फ्लॅटमध्ये एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता,” असं सुनीता म्हणाली होती.

पुढच्या जन्मात हा नवरा नको – सुनीता आहुजा

“मी त्याला सांगितलंय की मला पुढच्या जन्मात तो नवरा म्हणून नकोय. तो फिरायला जात नाही. मला पतीबरोबर बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा आहे. पण त्याने कामात खूप वेळ घालवला. आम्ही दोघे एकत्र चित्रपट पाहायला बाहेर गेल्याचं मला आठवतच नाही,” अशी खंत सुनीताने व्यक्त केली होती.

गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीताचे वक्तव्य

“मी आमच्या लग्नात पूर्वी खूप सुरक्षित होते, आता नाही,” असं ती हसत म्हणाली होती. “आधी मला काहीच फरक पडत नव्हता. पण आता त्याचे वय ६० पेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे मला भीती वाटते. जेव्हा तो तरुण होता तेव्हा तो इतका काम करायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता पण आता मला भीती वाटतं की रिकामा वेळ आहे तर काही करायला नको,” असं सुनीता म्हणाली होती. घटस्फोटाची बातमी आल्यानंतर या मुलाखतीत सुनीताने तिच्या मनातील खदखद व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.