गोविंदा हे ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचा अभिनय व डान्स याची त्यांनी एक वेगळी स्टाइल निर्माण केली. आजही त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय आहेत. याशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील ते व त्यांचे कुटुंब अनेकदा चर्चेत असलेले पाहायला मिळते. आता गोविंदा यांची पत्नी सुनिता आहुजाने एका मुलाखतीत त्यांची मुले टीना व यश यांच्या बॉलीवूडमधील करिअरबद्दल वक्तव्य केले आहे.

तिला चांगली संधी मिळाली तर…

लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांची पत्नी सुनिता आहुजा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने हिंदी रश या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नेपोटिझम तसेच इंडस्ट्रीमध्ये त्यांची मुलगी काम करणार का, याविषयी वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत सुनिता आहुजाने म्हटले, “तिला चांगला प्रतिसाद मिळत होता, पण सगळ्यांनी असे एक भीतीचे वातावरण तयार केले की जर टीना काम करत असेल तर गोविंदासुद्धा सेटवर येतील आणि ते कडक शिस्तीचे वडील असल्यामुळे इतर लोकांना बोलतील, शिवीगाळ करतील. मला कळत नाही, लोक अशाप्रकारच्या खोट्या गोष्टी का तयार करतात? ती चांगल्या भूमिकेची वाट बघत आहे. घर चालवण्यासाठी तिला संघर्ष करायची गरज नाही. जर तिला चांगली संधी मिळाली तर ती का काम करणार नाही? तुम्ही तिला संधी तरी द्या.”

iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Umesh Kamat
Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

याबरोबरच सुनिता आहुजाने बॉलीवूडमधील नेपोटिझमवर टीका केली. विशिष्ट कलाकारांच्या मुलांना काम मिळते, यावर भाष्य करत सुनिता आहुजा यांनी म्हटले, “नेपोटिझम बंद करा. दुसऱ्यांनादेखील काम करण्याची संधी द्या. एकाच ग्रुपमधील लोकांकडे काम असते. बाहेरसुद्धा बघा. इतरही लोक आहेत. आतासुद्धा टीना काम करण्यासाठी तयार आहे. जर तिला काम मिळाले, तर ती करेल. तिला काम करण्याची आवडदेखील आहे. एकाच कलाकाराला तुम्ही किती वेळा बघणार?”

अलीकडे टीनाने बॉलीवू़ड इंडस्ट्री सोडली आहे अशा अफवा ऐकायला मिळत होत्या. यावर बोलताना सुनिता आहुजाने म्हटले, “लोक असे का बोलतात ते मला कळत नाही. जी मुलगी इंडस्ट्रीमध्ये जन्माला आली आहे, ती का इंडस्ट्री सोडेल?”

गोविंदा व सुनिता आहुजा यांचा मुलगा यशसुद्धा यावर्षी एक लव्हस्टोरी असलेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यांच्या मुलांची गोविंदाबरोबर तुलना केली जाते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले, “नाही. मी माझ्या मुलाला हे शिकवले आहे की त्याने त्याच्या वडिलांची कॉपी केली नाही पाहिजे. त्याला त्याची वेगळी स्टाइल तयार करावी लागेल. त्याला सांगितले आहे की तू तुझा अभिनय व डान्स याची वेगळी शैली तयार कर. लोकांनी तुझी गोविंदाबरोबर तुलना करावी असे मला वाटत नाही. मला माहीत आहे की, चाहते व इंडस्ट्री त्यांच्यात स्पर्धा निर्माण करेल. गोविंदाची ९० ची त्याची स्टाइल आहे, तर यश त्याची वेगळी स्टाइल निर्माण करेल.”

“यशचा वेगळा संघर्ष आहे. विशेषत: त्याच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवावे लागते. एकदा त्याला कोणीतरी सांगितले होते की तुला आठ किलो वजन कमी करायचे आहे, तर त्याने आठवडाभर जेवण केले नव्हते. तो खूप मेहनती आहे. जर त्याने कोणती गोष्ट करायला सुरुवात केली तर ती पूर्ण होईल, याची तो काळजी घेतो. मी त्याला नेहमी सांगते की तुला गोविंदापेक्षा मोठा व्यक्ती बनायचे आहे.”

हेही वाचा: “जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

दरम्यान, टीनाने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला सेंकड हँड हसबंड (Second Hand Husband) या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम केले होते.

Story img Loader