अभिनेता गोविंदा १९९० च्या दशकातील सुपरस्टार होता. त्यानं त्या काळात अनेक हिट सिनेमे दिले. त्याच्या अनेक यशस्वी सिनेमांमध्ये विनोदी सिनेमांची संख्या लक्षणीय होती. विशेषतः दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याबरोबर केलेले अनेक सिनेमे हिट ठरले. ‘बीबी नंबर १’, ‘क्यों कि मैं झूठ नहीं बोलता’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’ या सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. एकेकाळी अनेक हिट सिनेमा देणाऱ्या या जोडीनं अचानक एकत्र सिनेमे करणं बंद केलं;ज्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं. नुकतच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी असं का घडलं ते सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी ‘टाइमआऊट विथ अंकित’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि गोविंदाबरोबरच्या अनेक किश्शांवर प्रकाश टाकला. याच मुलाखतीत सुनीता यांना गोविंदा आणि डेव्हिड धवन या जोडीनं अचानक एकत्र सिनेमे का बंद केलं, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनीता म्हणाल्या की, डेव्हिडनं गोविंदाला दुय्यम प्रमुख भूमिका( सेकंड लीड भूमिका) साकारायचा सल्ला दिला असावा; ज्यामुळेच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असतील.

हेही वाचा…“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

सुनीता पुढे म्हणाल्या, “माझ्या मते, तुम्ही एका विशिष्ट काळापर्यंत हीरो राहायला हवं. तुम्ही नव्वदीच्या दशकात स्टार असाल; पण आजच्या काळातही जर मुख्य भूमिका करायच्या असतील, तर ते शक्य नाही. हेच डेव्हिडनं गोविंदाला सांगितलं असेल की, जसं अमितजी (अमिताभ बच्चन), अक्षय सेकंड लीड भूमिका साकारतात, तशीच भूमिका तूही कर. त्या काळी गोविंदाच्या आजूबाजूला त्याचे चमचे होते, जे त्याला सांगत होते की, तू मुख्य हीरोच्याच भूमिका साकार. पण माझ्या मते, असं नाही होत तुम्हाला ट्रेंड बरोबर चालावं लागत.”

सुनीता पुढे म्हणाल्या, “गोविंदाला हा सल्ला पटला नसावा. कारण- तो त्याच्या सोलो हिट्समुळे (एकेरी प्रमुख भूमिकांमुळे) प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याला असं वाटलं असेल की, सेकंड लीड भूमिका करणं योग्य ठरणार नाही. पण मला असं वाटतं, की डेव्हिड या बाबतीत चुकीचा नव्हता आणि गोविंदाही त्याच्या दृष्टिकोनातून योग्य होता.”

हेही वाचा…Video: रणदीप हुड्डाने VIP रांगेतून नाही, तर सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकरी म्हणाले…

सुनीता यांनी असंही सांगितलं, “मी नेहमी गोविंदाला त्याच्या चुका दाखवत आले आहे. पण तो नेहमी म्हणायचा, “मेरे घर में ही मेरे दुश्मन हैं” (माझ्या घरातच माझे दुश्मन आहेत). पण मी त्याला सांगायची, “आम्ही दुश्मन नाही; फक्त वास्तव सांगतोय आणि ते तुला ऐकायला हवं.” हीरोच्या आजूबाजूला असलेल्या चमच्यांचा मला नेहमीच राग येतो. कारण- ते नेहमी त्याचं कौतुकच करतात; पण मी त्याला वास्तव सांगत होते.”

हेही वाचा…Video : दीपिका पादुकोणला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, लेकीच घरी झालं आगमन

दरम्यान, २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डू नॉट डिस्टर्ब’ हा गोविंदा आणि डेव्हिड धवन यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर या दोघांचं एकत्र काम करणं बंद झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita ahuja reveals why govinda and david dhawan stopped working together psg