गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. सुनीताने एका मुलाखतीत केलेल्या काही वक्तव्यांनंतर दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता, असं गोविंदाच्या मॅनेजरने सांगितलं होतं. तसेच ६ महिन्यांपूर्वी सुनीताने घटस्फोटाची नोटीस गोविंदाला पाठवली होती, पण नंतर मात्र त्यांनी मतभेद सोडवले, अशी माहिती सुनीताच्या वकिलांनी दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपूर्वी सुनीताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती आणि गोविंदा आता एकत्र राहत नाहीत. पण, त्यानंतर लगेचच सुनीता म्हणाली की दुसरे घर फक्त गोविंदाच्या राजकीय कामासाठी होते आणि ते वेगळे झालेले नाहीत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुनीताचा हा व्हिडीओ जानेवारी महिन्याच्या अखेरीस रेकॉर्ड केलेला आहे. “आम्ही वेगळे राहतो,” या वक्तव्याबद्दल सुनीता यात स्पष्टीकरण देताना दिसतेय. “आम्ही वेगळे राहतो, याचा अर्थ असा की जेव्हा तो राजकारणात आला तेव्हा माझी मुलगी मोठी होत होती आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते घरी यायचे. मी आणि माझी मुलगी, आणि आम्ही दिवसभर शॉर्ट्स घालून फिरायचो, म्हणूनच आम्ही आमच्या अपार्टमेंटच्या पलीकडे ऑफिस घेतले,” असं सुनीता म्हणते.

“या जगात कोणीही नाही जे मला आणि गोविंदाला वेगळे करण्याची हिंमत करेल,” असं सुनीता व्हिडीओत म्हणताना दिसते. दरम्यान, गोविंदाने २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता, पण त्याने २००८ मध्ये राजकारण सोडले. कारण तो संसदेत अनुपस्थित राहत होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २००४ मध्ये गोविंदाने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्याने निवडणुकांदरम्यान पक्षाचा प्रचारही केला होता.

गोविंदा व सुनीता आहुजा

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हिंदी रशला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजाने सांगितलं की ती मुलांबरोबर फ्लॅटमध्ये राहते, गोविंदा बंगल्यात राहतो. “आमची दोन घरं आहेत. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो. त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो १० लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसतो. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी फ्लॅटमध्ये एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता,” असं सुनीता म्हणाली होती.