‘गदर’, ‘घायल’, ‘घातक’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूड अभिनेता सनी देओलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘ढाई किलो का हाथ’ हा त्याचा गदर चित्रपटातील डायलॉग प्रसिद्ध आहे. सध्या सनी देओल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी देओलचा १९९६ साली ‘अजय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती सुनील दर्शन यांनी केली होती. याआधी त्यांच्या ‘इंतकाम’ व ‘लुटेरे” या चित्रपटातही सनी देओलने काम केलं होतं. परंतु, ‘अजय’ या चित्रपटादरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने या दोघांनीही पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. सुनील दर्शन यांनी नुकतीच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा >> आधी हाताने खेचलं, मग थेट दबंग स्टाइलने लाथ मारुन अमृता धोंगडेने तोडलं जेल; ‘बिग बॉस’ने सुनावली कठोर शिक्षा

सुनील दर्शन म्हणाले, “सनी देओल प्रचंड गर्विष्ठ आहे. त्याने माझी फसवणूक केली आहे. सनी देओलने माझ्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे तो मला परत करणार होता. मी पैसे मागितल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असं तो म्हणाला. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर चित्रपट बनवा. मी त्यात काम करेन, असंही तो म्हणाला होता. निवृत्त न्यायाधीश यांच्या समोर त्याने हे कबूल केलं होतं. मी त्याचा भाऊ बॉबी देओलबरोबर काम करत होतो. मला वाटलं सनी देओल त्याची चूक सुधारेल. पण त्याने मला फसवलं”.

हेही वाचा >> समीर चौगुलेंच्या हास्यजत्रेतील ‘त्या’ डायलॉगवर मुंबई पोलिसांनी बनवला भन्नाट मीम, पोस्ट शेअर करत म्हणाले…

पुढे ते म्हणाले, “सनी देओलने अजय चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच सोडलं. नंतर शूटिंगवेळी तो काही ना काही कारण द्यायचा. कोर्टाकडून त्याला नोटीस पाठवल्यानंतर चित्रपटातील डायलॉग आवडला नसल्याचं कारण त्याने दिलं होतं. चित्रपटातील डायलॉग मी त्याच्याकडून मान्य करुन का घेऊ? त्याच्यामुळे चित्रपटासाठी लावलेले खूप पैसे व वेळही वाया गेला. शेवटी चित्रपटाचं शूटिंग अर्धवटच राहिलं आणि चित्रपट तसाच प्रदर्शित करावा लागला. आज २६ वर्षांनंतरही त्याने माझे पैसे परत केलेले नाहीत”.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunnel darshan alleged sunny deol said he didnt return my money kak