Gadar 2 Review : स्वयंपाकघरात आपण एखादा पदार्थ बनवण्यात निपुण असतो, त्या पदार्थाची रेसिपीही आपल्याला अगदी तोंडपाठ असते, पण प्रत्येकवेळी तो पदार्थ अगदी पहिल्यांदा केलेला तसाच चविष्ट होईल याची खात्री मात्र कुणीच देऊ शकत नाही. सनी देओलच्या बहुचर्चित ‘गदर २’च्या बाबतीतही काहीसं असंच घडलं आहे. जुन्याच मसाल्यासह बनवलेला ‘गदर २’ हा पहिल्या भागाच्या प्रेमाखातर प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून तर आणतो पण प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात मात्र तो अपयशी ठरतो.

८ ऑगस्टला रात्री दिल्लीतील चाणक्य पीव्हीआर येथे भारतीत सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी ‘गदर २’चा खास प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा चित्रपट बघताना बऱ्याच अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले असल्याच्या बातम्या कालपासून सोशल मीडियावर आपण ऐकल्या असतीलच. आज ‘गदर २’ चित्रपटगृहात पाहिल्यानंतर या बातमीवर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न आपल्यासमोर पडू शकतो. कारण केवळ भारतीयच नव्हे तर एकूणच रक्षा करणाऱ्या संस्थांची, त्यांच्या कार्यप्रणालीची या चित्रपटात खिल्ली उडवली गेलेली आहे, असं निदान मला तरी चित्रपट पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवलं.

Guillain-Barré Syndrome in Kolkata
‘जीबीएस’चे आता महाराष्ट्राबाहेरही थैमान; कोलकातामध्ये दोन मुलांचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Guillain Barre syndrome outbreak in Pune
Guillain Barre Syndrome :‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर; ३० जण आयसीयूमध्ये तर १४ जण व्हेंटिलेटरवर
Once you find yourself, then the energy, the joy, the energy to live will continue to make you happy forever.
अन् मी मला सापडले…

आणखी वाचा : Gadar 2 Twitter Review : सनी देओलच्या बहुचर्चित ‘गदर २’ला मिश्र प्रतिसाद; नेटकरी म्हणाले, “वाह्यात…”

२००१ मध्ये जेव्हा ‘गदर’ आला तेव्हा आपण नुकतंच १९९९ च्या कारगिल युद्धातून सावरत होतो त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा होती. २०२३ मध्ये मात्र तशीच काहीच परिस्थिती नसल्याने १९७१च्या भारत-पाक युद्धाचे संदर्भ देऊन सादर केलेला ‘गदर २’ हा पहिल्या भागाची लोकप्रियता एनकॅश करण्याचा आणि दिग्दर्शकाचा मुलगा उत्कर्ष शर्मा याला पुन्हा चित्रपटात लॉंच करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ जेवढा ट्रेलरमध्ये दाखवला आहे अगदी तितकाच चित्रपटातही आहे अन् उर्वरित चित्रपट हा २००१ च्या ‘गदर’चा रीकॅप आहे.

तारा सिंग आणि सकीना यांचा वयात आलेला अल्लड मुलगा चरणजीत उर्फ जीते पाकिस्तानमध्ये अडकला आहे आणि त्याला सोडवण्यासाठी तारा सिंग पुन्हा त्याच्या डॅशिंग स्टाइलमध्ये पाकिस्तानकडे कूच करतो हीच एकूण चित्रपटाची कथा आहे. बाकी याआधी एक जगावेगळा ट्विस्ट दाखवून अनिल शर्मा यांनी मूळ कथानकाचं गांभीर्यच घालवून टाकलं असल्याने मध्यांतरानंतर समोर येणारा चित्रपट हा अत्यंत हास्यास्पद बनला आहे. पाकिस्तानची कट्टर वृत्ती, तिथल्या सैन्याचे चित्रण, तिथल्या सैन्यातील मुख्य अधिकाऱ्याचे चित्रीकरण शिवाय आपल्या भारतीय सैन्याचे चित्रण, युद्धाचे सीन्स, या सगळ्या गोष्टी फारच चुकीच्या पद्धतीने चित्रपटातून मांडल्या आहेत. एक मसालापट जरी असला तरी असे संवेदनशील मुद्दे हाताळताना साधन शुचिता ही आपण पाळायलाच हवी. कथा आणि पटकथेच्या बाबतीत हा दूसरा भाग पहिल्या भागाच्या आसपासही कुठेच फिरकत नाही.

चित्रीकरण, व्हीएफएक्स, संवाद या सगळ्या गोष्टीसुद्धा फार काही चांगल्या जमून आलेल्या नाहीत. अभिनयाच्या बाबतीतसुद्धा सनी देओल सोडल्यास बाकी कोणाचंही काम लक्षात ठेवण्यासारख नाही. उत्कर्ष शर्मा हा अत्यंत बालिश आणि सुमार नट आहे आणि त्याला पुन्हा इंडस्ट्रीत लॉंच करण्याचा हा अनिल शर्मा यांचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. १७ वर्षांचा काळ उलटला, २४ वर्षांचा घोड्यासारखा मुलगा झाला तरी अमीषा पटेलला एवढं सुंदर दाखवण्याचा अट्टहास हा पचनी पडत नाही, याबरोबरच तिला चित्रपटात रडण्याशिवाय काहीच काम नाही. पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या मनीष वाधवा यांचंही दात ओठ काढत सतत भारताच्या नावाने खडी फोडणं हे एका लिमिटनंतर असहनीय होतं. उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्यातील लव्ह स्टोरी ही थोडीफार रंजक वाटते.

बाकी मध्यंतरानंतर सनी देओलचे काही दमदार संवाद आणि काही थक्क करणारे अॅक्शन सीन्स हे सोडलं तर फारसं चित्रपटात काही नाही. या वयातही हे अॅक्शन करणाऱ्या सनी देओलकडे बघत राहावं असं वाटतं इतकंच काय ते समाधान. बाकी जुनाच मसाला, थोडेथोडके अॅक्शन सीन्स आणि रिमेक केलेली अन् सहज विसरता येतील अशी काही मोजकी गाणी सोडल्यास नवीन म्हणावं असं ‘गदर २’मध्ये काहीच नाही. तरी केवळ नॉस्टॅल्जिया म्हणून ज्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायचा आहे ते नक्कीच एकदा पाहू शकतात.

Story img Loader