बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. २३ दिवसात या चित्रपटाने ४९३.६५ कोटींचा व्यवसाय केला तर जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या २४ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅकनिकच्या रीपोर्टनुसार ‘गदर २’ने रविवारी तब्बल ८.५० कोटींची कमाई केली. अशा रीतीने रविवारचे आकडे लक्षात घेता ‘गदर २’ने दिमाखात ५०० कोटी क्लबमध्ये एंट्री केली आहे. या चित्रपटाने ५०१.८७ कोटींची कमाई केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘बाहुबली’ आणि ‘पठाण’नंतर सर्वात जलद ५०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘गदर २’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : ‘जवान’चा ट्रेलर पाहून राजकुमार हिरानी यांनी केला शाहरुखला मेसेज; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “मी त्यांना…”

जगभरात ‘गदर २’ने ६५० कोटींची कमाई केली आहे. २००१ साली आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ हा सीक्वल लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीच हे दोन्ही भाग दिग्दर्शित केले होते. नुकतंच या चित्रपटाची एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत तमाम बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

‘गदर २’मध्ये अमिषा पटेल आणि सनी देओल यांची जोडी पुन्हा बघायला मिळाली. यांच्यातील केमिस्ट्री लोकांना आजही तितकीच आवडली. याबरोबरच चित्रपटात अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत होता. ‘गदर २’च्या यशानंतर आता सनी देओलच्या ‘मा तुझे सलाम’ आणि ‘बॉर्डर’ या दोन्ही सुपरहीट चित्रपटांच्या सीक्वलचीसुद्धा चर्चा होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol ameesha patel starrer gadar 2 enters into 500 crore club avn