Gadar 2 Twitter Review : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ हा बहुचर्चित चित्रपट आज ११ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेले काही महीने या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ या सुपरहीट चित्रपटाच्या सीक्वलची प्रेक्षक याच्या घोषणेपासूनच वाट बघत होते. पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती आणि तशीच अपेक्षा या दुसऱ्या भागाकडूनही लोकांना होती.

इतकंच नव्हे तर या ‘गदर २’ने अडवांस बुकिंगमध्ये २० लाख तिकिटे विकल्याचा एक नवा रेकॉर्डही बनवला होता. चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल बऱ्याच लोकांनी ट्वीट करत त्यांचं मत मांडलं आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

आणखी वाचा : “एखादा चित्रपट फ्लॉप…” लायगरच्या अपयशाबद्दल विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया या आपल्याला सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. काहींना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे तर काहींनी यावार जबरदस्त टीकाही केली आहे. हा चित्रपट फार जुनाट आहे तसेच चित्रपटात सनी देओलचे फारसे सीन्स नाहीत अन् स्पेशल इफेक्टही खराब आहेत असं लोकांनी ट्वीट करत सांगितलं आहे. काहींनी तर दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावरही टीका केली आहे.

“हा अत्यंत वाह्यात चित्रपट आहे” असंही काही लोकांनी ट्वीट करत सांगितलं आहे. तर काहींना सनी देओलला पुन्हा मोठ्या स्क्रीनवर पाहून छान वाटल्याने त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. सनी देओलच्या अॅक्शनची लोकांनी खूप प्रशंसा केली आहे. एकूणच प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे. चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी पुन्हा बघायला मिळाली असून दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा हादेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Story img Loader