‘गदर २’ हा चित्रपट यावर्षीच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. २ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांचा याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २ तासात या टीझरला २ मिलियनपेक्षा अधिक व्यूज मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘गदर २’ ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धावर बेतलेली असेल असं या नव्या टीझरवरुन स्पष्ट होत आहे. पाकिस्तानात ‘Crush India’ च्या घोषणा देणारी लोक आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि अशातच सनी देओलची ‘तारा सिंग’च्या अवतारात एंट्री होताना टीझरमध्ये दिसत आहे, सनी देओल जबरदस्त ॲक्शन करताना आपल्याला दिसत आहे.

आणखी वाचा : ‘ॲनिमल’ हा ‘कबीर सिंग’पेक्षा अधिक वादग्रस्त; जेव्हा संदीप रेड्डी वांगा यांनी केलेलं मोठं विधान; म्हणाले…

याबरोबरच तारा सिंगची ओळख टीझरमध्ये ‘पाकिस्तानचा जावई’ अशी करून देण्यात आलेली आहे. तारा सिंगचा रुद्रावतार तर आपल्याला या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेच शिवाय त्याची एक हळवी बाजूही टीझरच्या शेवटी आपल्याला बघायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी ‘घर आजा परदेसी’ हे गाणं नव्या अंदाजात आपल्याला ऐकायला मिळतं.

टीझरमध्ये अमीषा पटेलची मात्र कुठेही झलक दाखवण्यात आलेली नाही. पहिल्या भागाप्रमाणेच या ‘गदर २’साठी सुद्धा प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत. दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २२ वर्षांपूर्वी रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नाही ते येणारा काळच ठरवेल.