सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट गदर २ काल शुक्रवार (११ ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
हेही वाचा- Gadar 2 Review : जुन्या आठवणींना उजाळा देणारा बहुचर्चित ‘गदर २’ पाहायलाच हवा का? एकदा वाचा
मिळालेल्या माहितीनुसार गदर २ ने प्रदर्शनाच्या पहिल्यात दिवशी ४० ते ४५ करोड रुपयांची कमाई केली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० लाख तिकिट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली होती. पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा- Gadar 2 Twitter Review : सनी देओलच्या बहुचर्चित ‘गदर २’ला मिश्र प्रतिसाद; नेटकरी म्हणाले, “वाह्यात…”
बॉलीवूडचा दबंग सलमान खाननेही गदर २ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहे. सलमानने पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘अडीच किलोचा हात ४० कोटींच्या ओपनिंगच्या बरोबरीचा आहे. सनी पाजी जबरदस्त. गदर 2 च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”
दरम्यान, ‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलसह, उत्कर्ष शर्मा, सिम्रत कौर, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा, मिर सरवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर रोहित चौधरी आणि मनीष वाधवा यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.