गेल्या काही महिन्यांपासून सनी देओल खूप चर्चेत आहे. आधी मुलाचं राजेशाही लग्न, नंतर त्याचा आलेला ‘गदर २’ चित्रपट आणि आता धाकट्या मुलाचं बॉलीवूड पदार्पण ही त्यामागची कारणं आहे. सनीच्या ‘गदर २’ ने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडत नवे विक्रम रचले. आता त्याने दारूबद्दल केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे. दारू लोक का पितात? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

घटस्फोटाच्या घोषणेनंतर सोफी टर्नरचं जाऊबाई प्रियांका चोप्राशी बिनसलं? एकमेकींना सोशल मीडियावर केलं अनफॉलो

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

‘माशाबेल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, मुलगा राजवीरचा पहिला चित्रपट ‘दोनों’चे प्रमोशन करताना सनीने दारू पिण्याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. “असं नाही की मी प्रयत्न केला नाही… मी इंग्लंडला गेल्यावर सोसायटीचा एक भाग होण्याचा प्रयत्न केला पण दारूचं मला काही कळलंच नाही. दारू इतकी कडू आहे व त्याचा वास इतका घाणेरडा आहे, दारू प्यायल्याने डोकं दुखतं, मग लोक दारू का पितात? खरं तर ती पिण्याचा काहीच फायदा नाही, त्यामुळे मी पुन्हा प्रयत्न केला नाही,” असं सनी म्हणाला.

“आयराच्या लग्नात मी खूप रडणार,” आमिर खानचे वक्तव्य; जावई नुपूरबद्दल म्हणाला, “तिने असा मुलगा निवडला जो…”

सनीचा धाकटा मुलगा राजवीर याने एक प्रसंग सांगितला. राजवीर एक बिअर प्यायला होता पण सनीला वाटलं की मुलगा नशेत घरी आला आहे. “जेव्हा मी पहिल्यांदा फक्त एकच बिअर घेतली होती, तेव्हा बाबाला कळलं होतं. बाबा झोपले होते आणि मी माझा चार्जर त्यांच्या पलंगाच्या शेजारी ठेवला होता तो घ्यायला मी गेलो होतो. पण मी चुकून त्यांचा चार्जर घेतला आणि त्यांना वाटलं की मी नशेत आहे. त्यांना माझ्याजवळ बिअरचा वास येत होता,” असं राजवीरने सांगितलं.

“माझ्या दोन्ही मुलांनी कधी दारू प्यायला सुरुवात केली ते मला कळलंच नाही. माझ्या घरात नेहमीच असंच होतं. माझ्या वडिलांना माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहित नव्हत्या. मी एका शिस्तप्रिय कुटुंबातून आलो आहे पण मला जे काही करायचे होते ते मी केले. मात्र मला दारू कधीच आवडली नाही,” असं सनी देओल म्हणाला.