बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सनी देओलचं नावही टॉपला आहे. आपल्या कामामुळे सतत चर्चेत असणारा सनी एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे. उत्तम मुलगा, पती, भाऊ या सगळ्या जबाबदाऱ्या तो पार पाडतो. सनी देओलचा १९ ऑक्टोबरला ६४वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सनीबाबत काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सनी वडिल धर्मेंद्र यांचा आजही किती आदर करतो? त्यांची किती काळजी घेतो? हे वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल.

आणखी वाचा – Video : शरीराचा भार दोन्ही हातांवर अन्…; प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहत्यांना देतेय फिटनेसचे धडे

मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनीने म्हटलं होतं की, “माझे वडील माझ्यासाठी सगळं काही आहेत. ते सगळ्यात सुंदर व चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. असं एकही काम नाही जे ते करू शकत नाहीत. विशेष म्हणजे कोणत्याच गोष्टीला ते घाबरत नाहीत. चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायचं आणि चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा मुळ स्वभाव आहे.”

पुढे तो म्हणाला, “मी फक्त त्यांचेच चित्रपट पाहतो. माझ्यासाठी आजही तेच बेस्ट आणि उत्तम व्यक्ती आहेत.” वडिलांबाबत सनी नेहमीच भरभरून बोलताना दिसतो. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांना ईशा देओल व अहाना देओल अशी दोन मुलं झाली. सनीचं आपल्या वडिलांवर नितांत प्रेम असलं तरी तो आपल्या सावत्र बहिणीशी मात्र कधीच जुळवून घेऊ शकला नाही.

आणखी वाचा – “मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

सनी व ईशा एकाच घरात राहत नाहीत. पण या दोघांचं कधीच जमलं नाही असं बोललं जातं. ईशा देओलला पाहणंही सनी बऱ्याचदा टाळतो. विशेष म्हणजे ईशाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सनी देओल, बॉबी देओल व धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर तिच्या विवाहसोहळ्याला उपस्थित नव्हते. ईशाच्या लग्नामध्ये सगळ्या विधी तिचा चुलत भाऊ अभय देओल याने केल्या. आजही सनी ईशाबरोबर फारसा दिसत नाही.

Story img Loader