सनी देओल व बॉबी देओल या दोन्ही भावांनी २०२३ हे वर्ष गाजवलं होतं. सनीने ‘गदर २’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. तर बॉबीने ‘अॅनिमल’मध्ये नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. दोन्ही भावांसाठी त्यांचे सिनेमे म्हणजे दमदार कमबॅक राहिले. सनी देओल लवकरच ‘जाट’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर बॉबीही त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या दोन्ही भावांनी इंडियन एक्सप्रेसच्या ‘SCREEN LIVE’ इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्य, स्टारडम, फिल्मी करिअर यावर गप्पा मारल्या.

पाहा लाइव्ह मुलाखत –