बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओलच्या घरी लगीनघाई सुरू आहे. सनी देओलचा मुलगा करण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. करणच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नुकतंच संगीत सोहळा पार पडला.

लाडक्या नातवाच्या संगीत सोहळ्यात दिग्गज अभिनेते धमेंद्र यांनी यमला पगला दिवाना गाण्यावर ठेका धरला. करणच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनी देओलनेही लेकाच्या संगीत सोहळ्यात कोणतीही कसर ठेवली नाही. गदर चित्रपटातील ‘मैं निकला गडी लेके’ गाण्यावर त्याने डान्स केला. याचा व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

हेही वाचा>> ‘आदिपुरुष’मध्ये एकनाथ शिंदे आहेत का? नेटकऱ्याकडून मुख्यमंत्र्यांची वानराशी तुलना, ट्वीटवर ठाणे पोलीस कमेंट करत म्हणाले…

लेकाच्या संगीत सोहळ्यात ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर डान्स केल्यामुळे सनी देओलला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. ‘गदर’चा सिक्वेल ‘गदर २’ ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे लेकाच्या लग्नातही चित्रपटाचं प्रमोशन केल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. “लग्नात पण प्रमोशन करत आहेत,” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “नेहमी पैशाच्या मागे धावत असतात. मुलाच्या लग्नात पण प्रमोशन करत आहेत,” असं म्हटलं आहे.

sunny-deol-troll

हेही वाचा>> ‘जलेगी तेरे बाप की…’, हनुमानाच्या डायलॉगला प्रेम सागर यांनी म्हटलं ‘टपोरी’, म्हणाले, “ओम राऊतने ‘आदिपुरुष’ला…”

“मुलाच्या लग्नात चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. सनी भाई एवढे वाईट दिवस आलेत का. तुमची आणखी बरीच गाणी ब्लॉकबस्टर ठरली आहेत. तरीही, वडील लेकाचं लग्न एन्जॉय करत आहेत, हे पाहून छान वाटलं”, असंही म्हटलं आहे. “हाईट ऑफ प्रमोशन” अशी कमेंटही केली आहे. अनेकांना सनी देओलच्या डान्सचं कौतुकही केलं आहे.

sunny-deol-troll

सनी देओलचा मुलगा करण व दिशा १८ जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.