सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच हा चित्रपट ओटीटवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे.
हेही वाचा- नव्या वेब सीरिजमधून उलगडणार तिहार जेलचं भयाण वास्तव; विक्रमादित्य मोटवानेचा खुलासा
चित्रपटगृहानंतर आता ‘गदर २’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. झी ५ ने याबाबतचे एक ट्वीटही शेअर करत घोषणा केली आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी झी5 आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा करार केला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाचे हक्क पन्नास कोटींना झी ५ ला विकले आहेत. तर या चित्रपटाचा पहिला भाग आधीच ओटीटीवर उपलब्ध आहे.
‘गदर २’ हा २००१ साली प्रदर्शित झालेला ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओलबरोबर अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५२७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ६८१ कोटींचा व्यवसाय केला आहे. ६० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाईत अनेक रेकॉर्ड मो़डले आहेत.