सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर २’ शुक्रवार (११ ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दरम्यान गदरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

मिळालेल्या माहितीनुसार गदर २ चित्रपट यूट्यूबवर लिक झाला आहे. HTD 3 star boys नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट लिक झाला आहे. या चॅनेलवर चित्रपटाची संपूर्ण कथा लिक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तब्बल ४ तास हा चित्रपट संबंधित यूट्यूब चॅनेलवर दिसत होता. त्यानंतर कारवाई करत या चित्रपटाला त्या यूट्यूब चॅनेलवरुन काढून टाकण्यात आलं आहे.

बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर गदर २ ने पहिल्याच दिवशी ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास ४५ कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने ८५ कोटींचा व्यवसाय केला आहे. पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- दिवंगत श्रीदेवींच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर यांनी शेअर केला खास फोटो, म्हणाले…

दरम्यान, ‘गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलसह, उत्कर्ष शर्मा, सिम्रत कौर, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा, मिर सरवार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर रोहित चौधरी आणि मनीष वाधवा यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol gadar 2 film leaked on youtube dpj
Show comments